Khandeshi Bharit Recipe : खानदेशाची वांग्यांचं भरीत खूप फेमस आहे. भरीताचे वांगे बाराही महिने तयार केले जाते पण हिवाळ्यात हे अजून चविष्ट लागते. त्यात हिरव्या पातीचा कांदा ,हिरव्या पातीच्या लसणाचा वापर केला तर हे भरीत अजून चविष्ट होते तर बघूया खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीताची सोपी रेसिपी.
खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीत साहित्य
- २ जळगाव भरीत वांगे
- कांद्याच्या पात
- २ टेबलस्पून हिरव्या पातीच्या लसणाची पेस्ट
- २-३ हिरव्या मिरच्या
- ५-६ कढीपत्त्याची पाने
- २ टेबलस्पून शेंगदाण्याचे भरड
- १ टीस्पून स्पून हळद
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर आवडीनुसार
- २ टेबलस्पून तेल
- १ टीस्पून मोहरीचे
खानदेशी पद्धतीचे वांग्याचं भरीत साहित्य कृती
स्टेप 1
सर्वात आधी वांग्याला तेल लावून मधून कट करून वांगे भाजून घेऊ
स्टेप 2
नंतर वांग्याची साल काढून वांगे कुस्करून घेऊ बाकीचे सगळे तयारी करून घेऊ लसणाच्या पातीची पेस्ट करून घेऊ
स्टेप 3
कढईत तेल तापून फोडणी करून घे मोहरीची रे तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण परतून घेऊ कांद्याची पात परतून घेऊन
स्टेप 4
शेंगदाण्याची भरड टाकून परतून घेऊ नंतर हिरव्या पातीच्या लसणाची पेस्ट टाकून परतून घेऊ
स्टेप 5
आता थोडी हळद मीठ टाकून कुस्करलेले वांग्याचे भरीत टाकून मी टाकून मिक्स करून घेऊ
स्टेप 6
वरुन हिरव्या पातेचा कांदा कच्चा टाकून घेऊ भरपूर कोथिंबीर टाकून घेऊ तयार वांग्याचे भरीत
स्टेप 8
वांग्याचे भरीत आणि ज्वारीच्या भाकरी तयार करून घेऊ परफेक्ट असा हा मेनू
हेही वाचा >> खानदेशी स्पेशल झणझणीत काळ मटण सूप; एकदा खाल तर खातच रहाल, नोट करा सोपी रेसिपी
स्टेप 9
छान गरमा-गरमा सर्व्ह करून घ्या..