महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी कोंडाळे

खानदेशी कोंडाळे साहित्य

Masala Bhakri
Masala Bhakri : मसाला भाकरी कधी खाल्ली का? मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक मसाला भाकरी, पाहा VIDEO
Idli batter recipe
VIDEO : एकदा इडलीचे पीठ तयार करा अन् चार महिने पाहिजे तेव्हा इडली बनवून खा, पाहा भन्नाट रेसिपी
Kanda Bhaji Without Besan, Marathi Recipe
बेसन न वापरता कांद्याची कुरकुरीत भजी बनवायला शिका; कांदा चिरताना ही एक छोटी ट्रिक देईल वेगळीच चव
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
Maharashtrian varan recipe nagpur special Phodniche varan recipe in marathi
विदर्भ स्पेशल: नुसत्या सुगंधानेच खावेसे वाटेल असे ‘फोडणीचे वरण’; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
easy recipe from only four onions
VIDEO : घरात भाजी नसेल तर टेन्शन घेऊ नका; ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”

२ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी डाळीचे पीठ
१ वाटी तांदळाचे पीठ
१ वाटी ज्वारीचे पीठ
२ बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून हिरवी मिरची,लसुन, जिरी,ओवा यांची पेस्ट
१ टीस्पून हळद,
१ टीस्पून लाल तिखट,
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी

खानदेशी कोंडाळे कृती

१. सर्प्रवथम एका परातीमध्ये सर्व पीठे एकत्र करावी. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसुन, जीरे आणि ओवा याची पेस्ट घालावी. तसेच हळद, लाल तिखट आणि मीठ घालावे सर्व मिश्रण एकजीव करावे.

२. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा आणि गरजेनुसार पाणी वापरून पीठ मळून घ्यावे. अर्धा तास पीठ भिजत ठेवावे. नंतर एक ओला सुती रुमाल घेऊन त्यावर पाण्याच्या हाताने पिठाचा गोळा घेऊन थापावे.

३. नंतर एक ओला सुती रुमाल घेऊन त्यावर पाण्याच्या हाताने पिठाचा गोळा घेऊन थापावे. भाकरी सारखे थापून त्याला मध्ये एक गोल करावा.

हेही वाचा >> घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत कुरकुरीत ‘सुरमई पॅटीस’ खाल तर खातच रहाल

४. नंतर गॅसवर तवा तापल्यावर रुमाल उचलून तव्यावर ठेवावे. चारी बाजूने तेल ओतून छान खरपूस भाजून घ्यावा. तयार झालेले कोंडाळे दही चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.

 (ही रेसिपी कूकपॅडवरुन घेतली आहे.)