Khari Biscuit Recipe : चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या देशात तर सकाळी एक चहाने दिवसाची सुरूवात होते. काही लोक दिवसातून दोन तीनदा चहा पितात. काही लोकांना चहाबरोबर बिस्किटे, खारी. टोस्ट, ब्रेड, पाव खाण्याची सुद्धा सवय असते. तुम्हाला सुद्धा असंच काहीतरी चहाबरोबर खायला आवडते का? यापैकी चहा आणि खारी तर अतिशय लोकप्रिय आहे. खारी सहसा अनेक जण विकत आणतात पण तुम्हाला घरच्या घरी खारी कशी तयार करायची, हे माहितेय का? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दररोज चहाबरोबर खाण्यासाठी कुरकुरीत खारी कशी तयार करायची, याविषयी सांगितले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

खारीची रेसिपी

साहित्य

  • मैदा
  • ओवा
  • मीठ
  • तेल
  • कॉर्नफ्लॉवर
  • तूप

हेही वाचा : ‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

कृती

  • सुरुवातीला एक कप मैदा घ्या.
  • त्यात ओवा घाला.
  • त्यानंतर चवीनुसार मीठ घाला
  • थोडे तेल टाका.
  • त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घ्या.
  • गोळा बाजूला ठेवून घ्या.
  • खारी खूसखूशीत होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साटा तयार करा.
  • आणि त्यानंतर मैदाच्या मळलेल्या पीठाच्या दोन पोळ्या लाटून घ्या.
  • त्यानंतर त्या दोन्ही पोळ्या एकमेकांवर ठेवा.
  • त्या पोळ्यांवर साटा लावा आणि त्यानंतर त्याच्या घड्या करा. त्यानंतर पुन्हा लाटून घ्या आणि उभ्या पाड्या आणि आडव्या खाऱ्या पाडा.
  • त्यानंतर मंद आचेवर या खाऱ्या तळून घ्या.
  • तळताना तेल आधी गरम करा आणि एक एक करून खाऱ्या तळून घ्या.
  • चहाबरोबर या खाऱ्या खूप चविष्ट वाटतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Ragi Date And Walnut Cake : टेस्टी अन् पौष्टिकही! नाचणीचा बनवा केक; मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बेस्ट ठरेल

sm.katta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरच्या घरी करा रोजच्या चहा बरोबर खायला खारी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई मी सेम टु सेम अशीच रेसीपी बनवली. खूप छान झाली खारी ” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान व्हिडीओ असतात ताई तुमचे. मी व्हिडीओ पाहूनच शिकतेय” आणखी एका युजरने लिहिलेय, “क्या बात है ताई, पहिला व्हिडिओ पाहिला तुझe, जाम भारी वाटला, बोलण्याची स्टाईल खतरनाक. फॉलो सुद्धा केलं” अनेक युजर्सना ही भन्नाट रेसिपी खूप आवडली आहे. जवळपास अडीच लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

Story img Loader