पुरणपोळीला महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. कोणताही सण असो किंवा कार्यक्रम पुरणपोळी ही जेवणाची शोभा वाढवते. महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांमध्ये पुरणपोळी ही अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पुरणपोळीचे देशासह जगभरात चाहते आहेत.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पुरणपोळी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण आपण सहसा हरभरा डाळीची साधी पुरण पोळी करतो पण तुम्ही कधी खव्याची पुरणपोळी खाल्ली का? आज आपण खव्याची पुरणपोळी कशी बनवायची, या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.
साहित्य :
- एक किलो हरभरा डाळ,
- पाव किलो खवा
- एक किलो साखर
- रवा
- कणीक
- मैदा
- एक चमचा वेलचीपूड
- अर्धा चमचा जायफळ पूड
- चिमूटभर केशर
- वाटीभर तेल
- अर्धा चमचा मीठ
- चिंच
- गूळ
हेही वाचा : फ्रुट कस्टर्ड, उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, लगेच नोट करा रेसिपी
कृती :
- हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी. हळद आणि तेल घालून शिजवून घ्यावी.
- शिजवल्यानंतर ही डाळ पुरणयंत्रावर चांगली बारीक करून घ्यावी.
- त्यात साखर घालून घट्ट पुरण शिजवावे
- वरुन त्यात केशरपूड वेलची-जायफळ पूड टाकावे.
- खवा हाताने बारीक करून तुपातून परतून घ्यावा आणि पुरणात मिक्स करावा.
- एका भांड्यात रवा पाण्यात भिजू घालावा.
हेही वाचा : हेही वाचा – चविष्ट, पौष्टिक मेथी मुठीया, गुजराती पद्धतीचे मेथीचे मुठीया एकदा नक्की ट्राय करा
- त्यानंतर त्यात मैदा, गव्हाचं पीठ आणि मीठ घालावे.
- तेल लावून एकत्र मिश्रणाची कणीक मळून घ्यावी.
- या मिश्रणाच्या पातळ पोळ्या लाटाव्या आणि त्यात खव्याचे पुरण भरावे
- गरम तव्यावर खमंग या पोळ्या भाजाव्यात.