प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी. तांदूळ, विविध डाळी, काही भाज्या आणि विशिष्ट मसाले एकत्र वापरून बनवलेली खिचडी एक हेल्थी मानली जाते. गरमागरम खिचडी आणि त्यावर चमचाभर तूप आरोग्यास फायदेशीर मानली जाते. यामुळे आजारपणात जर तुम्ही रोज बेचव पदार्थ खाऊन वैतागला असाल तरी मूगडाळ आणि तांदळापासून तयार होणारी झटपट पौष्टिक खिचडी ट्राय करू शकता. यासाठीच लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून मूगडाळ, तांदळापासून पौष्टिक खिचडी कशी बनवण्याची याची रेसिपी घेऊन आलो आहे. या खिचडीमुळे आजारापणात तोंडाला चव येईल आणि पोटही भरले. जाणून घेऊन खिचडी बनवण्याचे साहित्य आणि कृती…
साहित्य
१ वाटी तांदूळ, १ वाटी मूगडाळ, अर्था चमचा आलं, पाव चमचा हिंग, अर्था चमचा हळद, मीठ चवीनुसार,
खिचडी बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये तांदूळ, मूगडाळ स्वच्छा धावून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये किंवा भांड्यात किंचित तेलासह आलं, हिंग, हळद टाका, नंतर तांदूळ, मूगडाळ टाका. आता सहापट पाणी घालून शिजवा हे मिश्रण शिजवा. सहापट पाण्यात हे शिजवल्यास उत्कृष्ट खिचडी तयार होते.
यातील मूगडाळीत मोठ्याप्रमाणात प्रथिनं, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॅट्स सारख्या पोषक घटकांचा समावेश आहे. तसेच डाळीतील प्रथिने पोटाला जास्त काळ तृप्त ठेवू शकतात. तसेच स्नायूंच्या वाढीस मदत करतात. डाळींमधील फायबरच्या अधिक प्रमाणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. त्यामुळे ही खिचडी आजारी असलेल्या रुग्णासाठी फायदेशीर ठरले.