अनेकांना थंड रसमलाई खायला खूप आवडते. रसमलाई बाजारात विकत मिळते त्यामुळे लोक बाजारातून रसमलाई विकत घेऊन खातात. घरी रसमलाई बनवणे अनेकांना त्रासदायक वाटते. मात्र, अनेक स्वयंपाकप्रेमींना फक्त घरी बनवलेले गोड पदार्थ खायला आवडतात. अशाच खव्वयांसाठी आज आम्ही रसमलाईची रेसिपी सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तोंडाला पाणी आणणारी गोड रसमलाई तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया रसमलाई बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी.

रसमलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

हेही वाचा- मालवणी कोंबडी वड्यांनी खास करा संडे; खुसखुशीत वड्यांसाठी जाणून घ्या सोपी ट्रिक

  • ५ लिटर दूध
  • ६० ग्रॅम खवा (ऐच्छिक)
  • ५० ग्रॅम साखर
  • वेलची पूड
  • केशर, पिस्ता व बदामाचे काप
  • ५० छोटे रसगुल्ले. (विकतचेही चालतील.)

हेही वाचा- डायबिटीजमुळं त्रस्त आहात? एकदा नाचणीचा हलवा खाऊन बघाच, शरीरातील कोलेस्ट्रॉल होणार कमी?

रसमलाई बनवण्याची कृती –

सर्वात आधी एका जाड बुडाच्या मोठ्या कढईत दूध आटवायला ठेवा. ते दुध मध्ये मध्ये सारखे ढवळत राहा. अर्धे दूध आटले की त्यामध्ये खवा व ते साखर घालून चांगले ढवळून घ्या. त्यात केशर, वेलची पूड व पिस्ता-बदाम काप घालून गॅस अगदी मंद करा. पाकातून रसगुल्ले काढून दोन्ही तळहातात दाबून त्यातील सगळा पाक पिळून काढा. एकएक पिळलेला रसगुल्ला गरम दुधात सोडा. सगळे रसगुल्ले दुधात सोडून झाले की गॅस बंद करा. रसमलाई खा किंवा फ्रिजमध्ये थंड करून खा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीच्या रसमलाईचा आस्वाद घेऊ शकता.

Story img Loader