Kito Pizza Recipe In Marathi: आज संध्याकाळच्या नाश्ताला काय बनवायचं असा प्रश्न बऱ्याच गृहिणींना पडत असतो. त्यांना शाळा, कॉलेजमधून घरी परतणाऱ्या आपल्या मुलांना काहीतरी पौष्टिक खायला द्यायचा विचार येत असतो. नेहमीचे ते जुने, सवयीचे पदार्थ खाऊन मुलं कंटाळलेली असतात. अशा वेळी त्यांना चविष्ट काहीतरी खायल्या देण्यासाठी तुम्ही घरच्या घरी किटो पिझ्झा तयार करु शकता. तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती फिटनेस फ्रीक असेल, तर हा पदार्थ बनवू शकता. ४-५ गोष्टींचा वापर करुन फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या या पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.
साहित्य –
- रिफाइंड सोया पावडर १ वाटी
- बटर २ चमचे
- चीज १ क्यूब
- लसूण आणि चिली सॉस
- मेयोनेज
कृती –
- रिफाइंड सोया पावडर मळून घ्या.
- त्याचे पिझ्झा बेस तयार करा.
- दोन्ही बाजूंनी बटर लावून खमंग भाजा.
- सर्व्ह करताना वरून मेयोनेज, सॉस लावा आणि चीज आणि चिली सॉस टाका.
तुम्ही या पिझ्झामध्ये आवडीच्या भाज्यादेखील टाकू शकता. शिवाय पिझ्झा तयार झाल्यावर त्यावर ओरिगानो पावडर, चिली फ्रेल्क्स टाकायला विसरु नका.