Chinese Okra Recipe : आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहाराची गरज असते. या आहारात तुम्ही आता शिराळ्याची चटणीचाही समावेश करु शकता. कारण तुम्हाला उलटी, जुलाबाचा त्रास होत असेल, तर शिराळ्याची चटणी रामबाण औषध ठरु शकतं. शिराळाच्या बियांचाही औषधासाठी उपयोग होतो. दमा, खोकला, कफ, आम्लपित्त, पोटदुखीवर उपाय म्हणून शिराळ्याच्या चटणीचं सेवन करु शकता. शिराळाच्या बियांचं चूर्ण किंवा काढाही आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळं शिराळ्याची चटणी खाणं अनेकांना आवडतं. तर मग जाणून घेऊयात झणझणीत शिराळ्याची चटणीची सोपी रेसिपी.
साहित्य : कोवळी शिराळी १ ते २ , ओले खोबरे अर्धी वाटी, चिंचेचा कोळ थोडासा, हळद, मोहरी, हिंग, उडदाची डाळ, सुक्या मिरच्या, फोडणीसाठी- तिळाचे तेल, मोहरी, उडदाची डाळ, हिंग, सुक्या मिरच्या, फोडणीसाठी- तिळाचे तेल, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता
नक्की वाचा – तांदळाची नव्हे, ओल्या नारळाची खीर खाऊन बघा, पुन्हा एकदा तोंडाला पाणी सुटेल
कृती – शिराळी वरवर तासून घेऊन त्याचे मोठे तुकडे करा, भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या, उडदाची डाळ हे सर्व लालसर करुन घ्या. यामध्ये शिराळी, ओले खोबरे, हिंग, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून किंचित गार करुन वाटून घ्या. पळीत तेल गरुम करुन त्यात फोडणीचे साहित्य घालून लालसर करा आणि ही फोडणी शिराळाच्या मिश्रणावर ओता. आंबट तिखट असे तोंडी लावणे साध्या जेवणालासुद्धा चव आणते.
टीप- आंबट, तिखट अशी ही चटणी गरम भात आणि तूप यांच्याबरोबर खाल्ली जाते. हीच कृती वापरुन भोपळा, वांगी,दुधी,यांचीही चटणी करता येते.