Rassa Omlet Recipe : नॉन व्हेज खाण्याऱ्यांसाठी एक जबरदस्त मेजवानी आहे. नेहमी चिकनचा, मटणाच्या रस्स्यावर ताव मारणारी लोकं एखाद्या दिवशी वेगळी डीश खाणे पसंत करतात. मांसाहाराचा झणझणीत रस्सा करून खाणे अनेकांना आवडत असेलच. पण आजची सोपी आणि साधी रेसिपी समजून घेतल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटणार आहे. कारण हा चिकन, मटणचा रस्सा नसून आमलेटचा रस्सा आहे. आमलेटचा चविष्ट रस्सा खाण्यासाठी तुम्हाहा ही रेसिपा समजून घ्यावी लागेल. सकस आहारामध्ये अंड्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे नॉन व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी रस्सा आमलेट एक जबरदस्त फूड ठरेल, यात काही शंका नाही. रस्सा आमलेटची रेसिपी सोपी असल्याने तुम्हाला रस्सा ऑमलेटचा स्वाद झटपट घेता येणार आहे. रस्सा आम्लेटच्या रेसिपी समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींना फॉलो करा.
साहित्य – 1 किलो चिकन, 6 अंडी, 4 वाट्या ओलं खोबरं, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, 2 चमचे चिकन मसाला, 1 चमचा खडा मसाला, 2 चमचे गरम मसाला, 5 ते 6 कांदे, कोथिंबीर, 2 चमचे दही, मीठ, हळद, हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तेल.
कृती – प्रथम चिकन स्वच्छ धुऊन मीठ,हळद,चिकन मसाला आणि दही लावून चिकनचे तुकडे मॅरीनेट करुन घ्या. ओले खोबरे, 2 उभे चिरलेले कांदे, खडा मसाला भाजून आणि वाटून घ्या. पातेल्यात तेल टाकून 2 बारीक चिरलेले कांदे परतून घ्या. आलं-लसूण वाटण टाकून परतून घ्या. त्यानंतर चिकनचे तुकडे आणि थोडसं पाणी टाकून शिजवून घ्या. चिकन शिजले की त्यात वाटण आणि मीठ घालून पुन्हा शिजवा. हा झाला चिकनचा रस्सा.
आमलेटसाठी ३ बारीक चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, कोंथिबीर,हळद आणि मीठ घालून त्यात अंडी फेटुन घ्या. तव्यावर थोडसं तेल टाकून एक एक आम्लेट करुन खाण्यास देताना प्लेटमध्ये सर्वप्रथम चिकनचा रस्सा आणि त्यावर आम्लेट घालून कोथिंबीरीने सजवून पावाबरोबर खायला द्या.