आपल्याकडे अशा काही भाज्या आहेत, ज्या तुम्ही कधी खाल्ल्याच काय त्यांची नावंही ऐकली नसतील. त्यातीलच एक म्हणजे कमल काकडी. कमल काकडी पौष्टिक असते, मात्र ती खाण्याचत मर्यादा असतात. चला तर मग आज आपण याच कमल काकडीची एक सोपी रेसिपी पाहुयात. आज आपण पाहणार आहोत, कमल काकडी भूना मसाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमळाच्या काकडीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर आपली डायजेशन सिस्टीम साफ ठेवण्यास आणि त्याची क्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरतं. जेव्हा डायजेशन सिस्टीम साफ होते तेव्हा मेटाबॉलिज्म आपोआप मजबूत होतं. याने आपल्याला एनर्जेटिक वाटतं.

कमल काकडी भूना मसाला साहित्य

१/२ किलो कमल काकडी
मीठ चवीनुसार
२ कांदे एक इंच आलं 8लसूण दोन मिरच्या यांची बारीक पेस्ट
१० काजू व एक चमचा खसखस ची बारीक पेस्ट
१ वाटी घट्ट दही
१ चमचा तीळ
१ चमचा जिरे पाव चमचा हळद एक चमचा तिखट
१ चमचा किचन किंग मसाला
चीमूठभर साखर
कोथिंबीर
१ चमचा बटर

कमल काकडी भूना मसाला कृती

. प्रथम कमल काकडीचे साल काढून त्याचे मोठे तुकडे करावे व कुकरमध्ये पाणी टाकून मीठ टाकून त्याच्या चांगल्या तीन शिट्ट्या करून निथळत ठेवावे.

. कढई गॅस ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाले की जिरं घालून त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालावी. कांद्याची पेस्ट छान परतावी त्यामध्ये मीठ टाकावे. मग त्यामध्ये हळद तिखट किचन किंग मसाला व काजूची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परतावे.

हेही वाचा >> हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी रेसिपी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

. त्यामध्ये दही घालावे व सातत परतून तेल बाहेर येऊ द्यावे.नंतर निथळलेले कमल काकडी त्यात घालून छान परतत परतत त्याला तेल सुटेपर्यंत छान लालसर होईपर्यंत परतावे. नंतर कोथिंबीर पेरून बटर घालावे चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला द्यावे. स्टार्टर म्हणून खायला सुद्धा हे खूप छान लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know kamal kakdi health benefits kamal kakdi recipe in marathi kamal kakdi bhuna masala recipe srk
Show comments