Kohlyache Bond Recipe : कोहळं म्हणजे भोपळा. विदर्भात भोपळ्याला कोहळं म्हणतात. या कोहळ्यापासून तुम्ही खास गोड बोंड करू शकता. अनेकांना या रेसिपी विषयी माहिती नसेल कारण ही रेसिपी सहसा विदर्भात बनवली जाते. विदर्भातील पारंपारिक कोहळ्याची बोंडं कशी बनवावी, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
- कोहळं
- साखर
- गव्हाचं पीठ
- मीठ
- वेलची पूड
- खसखस
- मीठ
- तेल
हेही वाचा : Jeera Rice : दहा मिनिटांमध्ये असा बनवा हॉटेलसारखा जिरा राईस, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
कृती
- एक कोहळं घ्या आणि त्याची साल काढून घ्या
- त्यानंतर या कोहळ्याच्या फोडी कापून घ्या
- फोडीमध्ये पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये कोहळयाच्या फोडी चांगल्याने शिजून घ्या.
- कोहळ्याच्या फोडी शिजल्यानंतर त्यात साखर घालून कमी आचेवर शिजवून घ्या.
- मिश्रण थंड होऊ द्या.त्यानंतर खसखस, वेलची पूड टाका.
- त्यानंतर गव्हाचं पीठ या मिश्रणात एकत्र करा.
- त्यात चवीनुसार मीठ घाला. सर्व मिश्रण एकजीव करा.
- कढईत तेल गरम करा आणि गरम तेलातून बोडं तळून घ्या.
- कमी आचेवर बोडं तळून घ्या.