kojagiri kheer recipe in marathi: कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. चंद्राच्या मंद प्रकाशात, आप्तजनांसोबत गप्पा कारण, मजामस्ती करणं, नाच गाणं करत आनंद साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला गोड पदार्थांमध्ये खीर मसाला दूध करण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात खीरीची रेसिपी.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘स्पेशल खीर’ साहित्य
१ लिटर फुल क्रीम दूध
१५० ग्रॅम बासमती तांदळाचे तुकडे
१ चमचा तूप, काजू-बदाम-पिस्त्याचे काप
१ टीस्पून गुलाब पाणी
२५० ग्रॅम साखर
१/२ टीस्पून वेलची पावडर
१५-२० गुलाबाच्या पाकळ्या
५-६ केशर काड्या
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘स्पेशल खीर’ कृती
एका जाड बुडाच्या पातेल्यात एक लिटर दूध घेऊन ते साधारण पाऊण लिटर होईल इतके उकळा.
जरा घट्टसर झालेल्या या पाऊण लिटर दुधात आवश्यकतेनुसार तांदूळ घाला.
तांदूळ शिजेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहा.
तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर यात आवश्यकतेनुसार साखर घाला.
साखर विरघळल्यानंतर खीरीत सुका मेवा आणि वेलची पूड टाका.
हेही वाचा >> Kojagiri Purnima 2024: कोजागरीला फक्त ५ मिनिटात करा चवदार, स्वादीष्ट मसाला दूध; या घ्या इस्टंट रेसेपीज
५ ते ७ मिनिटे हे खीरीचे मिश्रण नीट ढवळून, नंतर गॅसची आच बंद करून खीर थंड करून सर्व्ह करा.