Prawns Curry Recipe: मासे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, यात बिन काट्याचे मासे अनेकजण आवडीने खातात. विशेषत: बऱ्याच लोकांना कोळंबी हा मच्छीचा प्रकार अधिक आवडतो. यामुळे कोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जाते. यात तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे कोळंबीपासून तयार होणारे पदार्थ ऐकले असतील, पण आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल अस्सल झणझणीत कोकणी पद्धतीचं ‘ कोळंबी बटाटा रस्सा’ कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत.
कोळंबी बटाटा रस्सा साहित्य
१०-१२ कोलंबी
१ उकडलेला मोठा बटाटा
२ चिरले ले कांदे
१ टॉमेटो
१/४ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी कोथंबीर
२ तुकडा आले, १ छोटा लसुण
१ चमचा लाल मिरची पूड
१ चमचा धनेजीरे पुड
१/२ गरम मसाला
१/२ संडे मसाला
कोळंबी बटाटा रस्सा कृती
स्टेप १
प्रथम आले लसूण पेस्ट तयार करावी नंतर अर्धा टॉमेटो उभा कापून घ्या, कांदा पण उभा कापून घ्या.आता कापलेला कांदा टॉमेटो आणि खोबरे एकत्र मिक्सर ला लावून वाटण तयार करा. टॉमेटो अर्धा आहे त्याला बारीक कपा, आणि बटाट्याची मोठ्या फोडी कापा.
स्टेप २
आता एका टोपात २ मोठे चमचे तेल गरम कराला ठेवा आणि त्यात
स्टेप ३
आले लसूण पेस्ट पर्ता नंतर वाटण तयार केलेले आहे ते आणि बारीक चिरलेला टोमॅटो घला सगळ एकत्र करून
स्टेप ४
छान तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात उकडलेले बटाटे घालून छान परतून घेतल्या नंतर त्यात सर्व मसाले एकत्र करून टाका, हलवा आणि त्यात स्वच्छ धुतलेले सोललेली.
हेही वाचा >> खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी; लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी रस्सा भाजी नक्की ट्राय करा
स्टेप ५
कोलंबी टाकून हलवा, त्यात ३ कप पाणी,चवी पुरते मीठ घालून १ मोठी उकळ आले की गॅस फ्लेम अगदी कमी करा आणि फक्त ३ मिंट उकळून घ्यावे. कोलंबी जास्त उकळून नाही द्याची. असा हा तिखट कोलंबी बटाटा रस्सा टेस्टी लागतो.