कोकणातील काही खास पारंपरिक पदार्थ जे आता विस्मरणात गेले आहेत त्यांची रेसिपी जाणून घेत, हे पदार्थ करून बघावेत असेच आहेत. एक वेगळी आणि पारंपरिक चव चाखण्यासाठी नक्की करून बघा कोकणी नाश्त्याचा पदार्थ ‘कायलोळी’! मुळात हा पदार्थ कर्नाटकात बनविला जात असे पण, हळूहळू तो कोकणातही लोकप्रिय झाला. पौष्टीक आणि चुरचुरीत अशी कायलोळी बनविण्याची सोपी पद्धत…!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • १ वाटी तांदळाचे पीठ,
  • १/२ वाटी बारीक रवा,
  • १ कांदा, १ मिरची,
  • ३ कप दुध, अथवा दिड कप दुध आणि दिड कप पाणी
  • थोडे मीठ, चवीला चिमुटभर साखर.

चटणीसाठी :-

  • १/२ नारळाचा चव, ( किस )
  • ३-४ मिरच्या ,
  • थोडी कोथिंबीर,
  • थोडे मीठ, व चवीला साखर.

कृती :-

  • एका पातेल्यात तांदळाचे पीठ आणि रवा दुधात किंवा दुध्-पाण्यात भिजवुन १५ मिनिटे ते अर्धा तास ते भिजत ठेवावे. नंतर त्यात १ कांदा व १ मिरची बारीक चिरुन घालावी.
  • नेहमीप्रमाणे निर्लेपच्या तव्यावर डोसे करतो त्या प्रमाणे ते घालावेत. दुधात भिजवल्यामुळे एक प्रकारची सुंदर चव येते.
  • आधीच वर सांगितल्याप्रमाणे चटणी करावी. चट्णीसाठी वेळ नसेल तर नुसते तुपाबरोबर पण कायलोळी
    मस्त लागते.

हेही वाचा >> भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान ‘झिरकं’

  • वरील प्रमाणात ७ ते ८ कायलोळ्या/ घावन होतात.