कोकणी खाद्यसंस्कृती विविध पाककृतींनी समृद्ध आहे. यामुळे कोकणी पदार्थ केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातील खाद्यप्रेमींना भुरळ घालतात. यासाठी कोकणात जगभरातून पर्यटक विशेषतः मांसाहारासाठी येतात. कोकणी पदार्थांची चव त्यांच्या मसाला वाटणात लपलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक कोकणी पदार्थ खाताना चवीला तितकाच लज्जतदार लागतो. यामुळे आम्ही तुम्हाला आज कोकणी स्‍टाइलमध्‍ये चटपटीत आणि चवदार मसाला वाटण बनवण्‍याची पद्धत सांगणार आहोत. याच्या वापराने प्रत्येक भाजीची चव वाढेल.

कोकणी स्टाईलचे मसाला वाटण बनवण्याची पद्धत

कोकणी मसाला वाटण बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही २ वाटी खोबरं, तीन मध्यम आकाराचे कांदे, २ चमचे तेल, पाच ते सहा लसूण पाकळ्या, दालचिनी, लवंग, काळीमिरी, खसखस आवश्यक आहेत. भरपूर कांदा, लसूण आणि नारळ ही कोकणी खाद्य पदार्थांची खासियत आहे. कोकणात अनेक भाज्यांमध्ये नारळाचा वेगवेगळ्याप्रकारे वापर केला जातो.

How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Sabudana Kichadi
साबुदाना खिचडी चिकट होते? ढोकळा लालसर होतो अन् कढी फुटते…रोजचा स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, तासाचे काम झटक्यात होईल पूर्ण
Korean potato balls recipe in marathi
नवीकोरी कोरियन रेसिपी घरीच करून पाहायचीय, मग लगेच करा ‘कोरियन पोटॅटो बॉल्स’, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

मसाला वाटण बनवण्यासाठी सर्व प्रथम कडईत १० मिनिटे खिसून घेतलेले खोबरं खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर कांदा उभा चिरून तोही तेलात लालसर होऊपर्यंत भाजून घ्या, यातच तुम्ही आलं टाका, आता गरम मसालेही त्या कडईत हलके तळून घ्या. यानंतर सर्व मिश्रण एकत्र करुन मिक्सरला लावून बारीक करा. या मिश्रणात चुकूनही पाणी घालू नका, कारण पाणी न घातल्यास हे मसाला वाटण तुम्ही १० ते १५ दिवस आरामात वापरु शकता.

अशा पद्धतीने तयार झालेला मालवणी मसाला वाटण तुम्ही तिखट डाळ, मटण, चिकन, अंडा करी यासह इतर मांसाहारी पदार्थांमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये ग्रेव्ह म्हणून वापरू शकता. या कोकणी मसल्याच्या वापर करुन तुम्ही झटपट रस्साभाजी बनवून ती भातासोबत खाण्याचा आनंदही घेऊ शकता.

मासे, चिकन, मटण याबरोबरच आमटी, सार, कडीचे असे अनेक खाद्य पदार्थ कोकणची खासियत आहे. यात विशेशता मासे, तांदूळ आणि नारळ हा कोकणी खाद्यसंस्कृतीमधील मुख्य घटक मानला जातो. यामुळे तुम्हाला कोकणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये खोबऱ्याचा वापर केलेला दिसेल.

Story img Loader