Korean Potato Balls Recipe: आजकाल कोरियन पदार्थांच वेड सगळीकडेच पाहायला मिळतंय. त्यात कोरियन स्पायसी नूडल्स हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा ठरलाय. आणि प्रत्येक ठिकाणी अशा कोरियन पदार्थांचे लहान मोठे स्टॉल्स आणि खास कोरियन रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात. खवय्यांची गर्दी बघता आणि नेहमीच बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी वेळात तुम्ही कोरियन रेसिपी बनवू शकता. चला तर मग आज आपण घरच्या घरी असाच एक कोरियन पदार्थ बनवून पाहणार आहोत ज्याच नाव आहे, ‘कोरियन पोटॅटो बॉल्स’
साहित्य (Korean Potato Balls Ingredients)
४ उकडलेले बटाटे
४ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
१ लिटर पाणी
१ टेबलस्पून तेल
४-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
कोथिंबीर
अर्धा टेबलस्पून मीठ
अर्धा टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
सफेद तिळ
अर्धा कप गरम तेल
कोरियन पोटॅटो बॉल्सची रेसिपी (Korean Potato Balls Recipe)
प्रथम ४ उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात ४ टेबलस्पून कॉर्नफ्लोर घाला आणि मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा.
एका पातेल्यात १ लिटर पाणी आणि १ टेबलस्पून तेल घाला आणि बटाट्याचे गोळे त्यात टाका.
१० मिनिटे उकडू द्या.
नंतर ४-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबीर, २ टेबलस्पून सोया सॉस, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, सफेद तिळ आणि अर्धा कप गरम तेल घाला.
सगळं छान मिसळा.
तुमचे ताजे कोरियन पोटॅटो बॉल्स तयार आहेत.