How To Make Kothimbir Bhaji : कोथिंबीरचा वापर आपण जेवणात रोज करतो. कोणताही पदार्थ तयार करुन झाल्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की, चवसुद्धा येते आणि पदार्थाची सजावट सुद्धा होते. आपण सहसा कांदा, बटाटा, मका, बीट, कोबी यांचे पकोडे, कटलेट किंवा भजी बनवतो. पण, तुम्ही कधी कोथिंबिरीची भजी खाल्ली आहे का? नाही… तर घरात १० रुपयांची कोथिंबिरीची जुडी असेल तर त्यापासून तुम्ही गरमागरम कोथिंबिरची कुरकुरीत भजी (Kothimbir Bhaji) बनवू शकता. काय लागेल साहित्य, कशी बनवायची ही भजी चला जाणून घेऊ…
साहित्य (Kothimbir Bhaji Ingredients) :
१. दोन वाट्या चण्याचं पीठ
२. अर्धी वाटी पाणी
३. कोथिंबीर
४. खायचा सोडा
५. मीठ
कृती (How To Make Kothimbir Bhaji) :
१. सगळ्यात पहिला कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
२. एका भांड्यात दोन वाट्या चण्याचं पीठ, अर्धी वाटी पाणी, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाका.
३. त्यानंतर त्यात खायचा सोडा टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
४. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग तेलात तळून घ्या.
५. अशाप्रकारे तुमची कोथिंबिरची भजी (Kothimbir Bhaji) तयार.
कोथिंबिरीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Kothimbir ) :
हिरवी दिसणारी कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवण्याचे काम करत नाही तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हिरव्या कोथिंबीरीमध्ये ऊर्जा, कार्बोहायड्रेट, चरबी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, सेलेनियम, मॅंगनीज, सोडियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. इतकंच नाही तर कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी असे गुणधर्मही आढळतात. तर आरोग्यदायी कोथिंबिरीची ही गरमागरम भजी (Kothimbir Bhaji) बनवून तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की खायला द्या.