पराठा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.वेगवेगळ्या भाज्यांचे तुम्ही पराठे खाल्ले असेल पण कोथिंबीरचा स्वादिष्ट पराठा तुम्ही खाल्ला आहे का? आज आपण याच कोथिंबीरचा पराठा कसा बनवायचा, हे सांगणार आहोत.
कोथिंबीरचा उपयोग आपण दररोजच्या जेवणात करतो. सर्वात जास्त वापरली जाणारी ही पालेभाजी जेवणाचा स्वाद वाढवण्यास सुद्धा मदत करते पण जेव्हा तुम्ही कोथिंबीरचा पराठा खाल तर तेव्हा हाच स्वाद दुप्पट वाढेल.चला तर रेसिपी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • कोथिंबीर
  • गव्हाचे पीठ
  • हळद
  • हिरवे मिरचे
  • धनेपुड
  • कढीपत्ता
  • पुदिन्याची पाने
  • आलं लसूण
  • ओवा
  • जिरे
  • तेल किंवा तूप

हेही वाचा : Rice Cutlet : शिळ्या भातापासून बनवा स्वादिष्ट राइस कटलेट, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • कोथिंबीर धुवून बारीक चिरुन घ्यावी
  • त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर गव्हाच्या पीठात टाकावी
  • त्यात हळद, धनेपूड, मसाला, मीठ टाकावे
  • त्यात पुदिन्याची पाने आणि कढीपत्ता टाकावा
  • आणि त्यात थोडा ओवा टाकावा.
  • हिरवे मिरचे, आलं लसूण आणि जिरे बारीक करुन त्यात टाकावे.
  • सर्व मिश्रण एकत्र करावे
  • त्यात पाणी टाकून पीठ चांगल्याने मळून घ्यावं
  • पीठाचा गोळा करुन दहा मिनिटे झाकून ठेवावा
  • त्यानंतर या पीठाचे लहान गोळे करुन पराठे लाटावेत
  • गरम तव्यावर तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही बाजून चांगला भाजून घ्यावा.
  • हा कोथिंबीरचा पराठा तुम्ही लोणचं किंवा चटणीबरोबर खाऊ शकता.