Kothimbiricha Zunka Recipe : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीची ही संपूर्ण देशात आणि देशाबाहेर लोकप्रिय आहे. झुणका आणि भाकर हे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या लोकं आवडीने झुणका भाकर खाण्याची इच्छा व्यक्त करतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात झुणका हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तुरीच्या दाण्याचा किंवा हरभराच्या डाळीचा झुणका तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी कोथिंबिरीचा झुणका खाल्ला आहे का?
कोथिंबिरीचा झुणका हा बनवायला अत्यंत सोपी आणि तितकाच चवीला स्वादिष्ट आहे. हा झुणका तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. हिवाळ्यात कोथिंबिरीचा झुणका आवर्जून बनवला जातो.अनेक जण आवडीने हा झुणका खातात. बाजरीच्या भाकरीबरोबर या झुणक्याची चव अप्रतिम लागते. हिवाळ्यात बाजरीची भाकर आणि झुणका हा एक चांगला पौष्टिक आहार आहे. तुम्हाला माहिती आहे का, कोथिंबिरीचा झुणका कसा बनवायचा? आज आपण ही कोथिंबिरीचा झुणका बनवण्याची पद्धत जाणून घेऊ या. ही रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य
कोथिंबीर
हरभरा डाळ
बारीक चिरलेले कांदे
हिरव्या मिरच्या
लसणाच्या पाकळ्या
जिरे
धने
तेल
चवीनुसार मीठ
हेही वाचा : Shev Bhaji : चुलीवरची शेवभाजी कधी खाल्ली का? अशी बनवा झणझणीत शेवभाजी, VIDEO व्हायरल
कृती
सुरुवातीला कोथिंबिर धुवून निथळून घ्यावी.
त्यानंतर बारीक चिरुन घ्यावी
दोन तीन तासाआधी हरभराची डाळ भिजत घालावी आणि त्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी.
डाळ वाटताना त्यात लसणाच्या पाकळ्या, धने आणि जिरे आणि मीठ टाकावे.
हे डाळीचे मिश्रण हळद घालून कोथिंबीरमध्ये एकत्र करावे.
त्यानंतर एका कढईत तेल गरम करावे आणि त्यात जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले मिरचे घालून फोडणी द्यावी. चांगले परतून घ्यावे.
त्यानंतर त्यात डाळ आणि कोथिंबिरीचे मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालावे.
त्यानंतर चांगले पु्न्हा परतून घ्यावे.
मंद आचेवर कढईवर झाकण ठेवावे.
त्यानंतर झाकण काढून पु्न्हा पाच मिनिटे शिजू द्यावे
त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
गरमा गरम झुणका तयार होईल. तुम्ही हा झुणका भाकरीबरोबर सर्व्ह करू शकता.