Dahi Bhat : आज देशभरात जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. कृष्णाचे आवडते जेवण म्हणजे दही भात. दही भात कृष्णाला खूप आवडायचा त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून कृष्णाला दही भाताचा नैवद्य दाखवला जातो. दही भात खरं तर खूप पौष्टीक आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्व जण दही भात आवडीने खातात
आज आपण कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • तांदूळ
  • दही
  • दूध
  • तेल
  • हिंग
  • जिरे
  • मोहरी
  • लाल सुक्या मिरच्या
  • किसलेले आले
  • कडीपत्ता
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : बेसन लाडू कडक होतात? टेन्शन घेऊ नका, असे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुवा.
  • त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ शिजवा.
  • भात थंड झाल्यानंतर त्यात दही आणि दूध टाका.
  • त्यात चवीनुसार मीठ आणि किसलेलं आले टाका.
  • एका कढईत तेल टाका आणि गरम तेलात कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग आणि सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या.
  • ही फोडणी भातावर टाका
  • कोथिंबीर बारीक चिरुन भातावर टाका.
  • दही भात तयार होईल.