Krishna Janmashtami Sunthavada Recipe: कृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. यंदा २६ऑगस्टला हा सण साजरा केला जाईल. या दिवशी रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते. यावेळेस प्रसाद म्हणून ‘सुंठवडा’ दिला जातो. चला तर मग या कृष्ण जन्माष्टमीला सुंठवडा अगदी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा, याची रेसिपी जाणून घेऊया.
सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य (Sunthavada Recipe Ingredients)
- १/२ कप खारीक (सुके खजूर)
- १४-१५ बदाम
- १०-१२ काजू
- १ टीस्पून एका बडीशेप
- १ टीस्पून पांढरे तीळ
- १ टीस्पून खसखस
- ४ वेलची
- १/२ कप सुके खोबरे (किसलेले)
- ३ चमचे साखर
- १ टीस्पून खडीसाखर
- १ टीस्पून मनुका (भाजलेले)
- १ टीस्पून सुंठ पावडर
सुंठवडा तयार करण्याची कृती (Sunthavada Recipe)
१. प्रथम खारीक, बदाम, काजू, बडिशेप, पांढरे तीळ हे सगळे पदार्थ एक एक करून हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर खसखस आणि वेलची एकत्र करून हलकी भाजून घ्या.
२. नंतर अर्धी वाटी सुखं खोबरंदेखील हलकेसे भाजून घ्या.
३. त्यानंतर खारीक, बडिशेप, पांढरे तीळ, खसखस, वेलची एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. यात साखर आणि खडीसाखर घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण थोडेसे बारीक करून घ्या.
४. त्यानंतर उरलेले काजू,बदाम हे ड्राय फ्रूट्स आधीचे मिश्रण असलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात सुंठ पावडर घालून घ्या.
५. त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घ्या.
६. सुके खोबरे हाताने बारीक करून घ्या. तुम्हाला खोबरे अगदीच बारीक हवे असेल तर मिक्सरलादेखील लावू शकता.
६. त्यानंतर हे बारीक केलेले सुके खोबरे त्या मिश्रणात मिसळा आणि वरून मनुके घाला.
नोट- यात ओवा किंवा डिंकदेखील टाकतात, पण अनेकदा उपवासाला ओवा किंवा डिंक चालत नाही.
ही रेसिपी ‘रुचकर मेजवानी’ यांच्या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.