जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गिलक्याची पातळ भाजी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खान्देश स्पेशल कांदा कुरडई भाजी. पापडाप्रमाणे कुरकुरीत कुरड्याही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. बहुतेक लोकं कुरडई तांदळाच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या चिकापासून तयार करतात. कुरडई चवीला भन्नाट लागतात. कुरकुरीत कुरडई फक्त तळून खात नसून, त्याची भाजी देखील तयार करण्यात येते. जर आपल्याला कुरडईची भाजी खायची असेल तर, कांदा कुरडई ही भाजी ट्राय करून पाहा.

खान्देश स्पेशल कांदा कुरडई भाजी साहित्य

५ ते ६ कुरडई/भुगा /चुरा
२ कांदे बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
६ ते ७ लसुण पाकळ्या
१/२ वाटी कोथिंबीर
२ टेबलस्पुन लाल तिखट
१ टेबलस्पुन गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून हिंग
१ टेबलस्पुन जीरे
मीठ चवीनुसार

खान्देश स्पेशल कांदा कुरडई भाजी कृती

१. कुरडई आधी पाण्यात भिजवून घ्या साधारण १० मिनिटे भिजत ठेवा

२. कुरडई छान मऊ झाली की पाणी काढून घ्या व कुरडई चाळणीत किंवा ताटात काढुन ठेवा.

३. आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिंग मस्त फुल्ल की त्यात कांदा टोमॅटो घालुन मस्त मऊ होईपर्यंत छान शिजवुन घ्या.

४. आता त्यात वरील सर्व मसाले घालून छान फ्राय करून घ्या. मसाला फ्राय झाला की भिजवलेल्या कुरडईचा चुरा (भुगा) घाला आणि छान परतून घ्या.

हेही वाचा >> घरगुती पद्धतीने बनवा शेवय्या कस्टर्ड; असं प्रमाण वापरुन कस्टर्ड बनवले तर १००% परफेक्टच होणार

५. १ ते २ मिनिटे वाफ काढुन घ्या व कोथिंबीर भुरभुरून तयार आहे. गरमागरम कांदा कुरडईची भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. तोंडी लावायला, वरण भाता बरोबर छान पर्याय आहे. (ही रेसिपी कूकपॅडवरुन घेतली आहे.)