Lachha Paratha Recipe In Marathi: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. सुट्ट्या असल्यामुळे शाळा-कॉलेजला जाणारी मुलं घरीच असतात. दिवसभर खेळून मुलं संध्याकाळी घरी पाऊल टाकल्यावर लगेच भूक-भूक करायला लागतात. खेळून दमून आल्यावर त्यांना काहीतरी चमचमीत हॉटेल स्टाइल खायला हवं असतं. ऑफिसला जाणारी मंडळी सुद्धा संध्याकाळी घरी परतात. संपूर्ण दिवस काम करुन घरी आल्यावर चहासोबत नाश्ता मिळाला तर या लोकांचा मूड खुलतो. तेव्हा घरातील गृहिणी पोहे,उपमा असे पदार्थ बनवतात. पण हे पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात. मोठ्यांनाही नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ खायचा असतो. त्यामुळे बरेचदा गृहिणींसमोर संध्याकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही लच्छा पराठा हा पर्याय निवडू शकता. हा पदार्थ उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो असे म्हटले जाते. झटपट बनणारे लच्छा पराठे बनवण्यासाठी मोजून ३ ते ४ गोष्टी लागतात. चला तर मग हा टेस्टी आणि हेल्दी पराठा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात..

साहित्य:

  • २ कप गव्हाचे पीठ
  • ३ ते ४ चमचे तूप
  • १/४ टीस्पून मीठ

कृती:

  • एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये पाणी घालून ते मळून घ्या. पुढे त्यात मीठ टाका.
  • पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. थोड्या वेळाने ते हाताने मळा.
  • त्यावर १/२ टीस्पून तेल लावा. जेणेकरुन पीठ कोरडे राहणार नाही. पुढे त्यावर कपडा टाकून ते झाका.
  • १५ मिनिटांनंतर कपडा बाजूला काढून ते पीठ पुन्हा मळून घ्या.
  • मळलेल्या पीठाचा एक मोठा गोळा घेऊन लाटा. त्यावर १ ते १.५ चमचा तूप लावा आणि थोडसं पीठ लावा.
  • पुढे ती पोळी फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या-छोट्या आकारात दुमडा.
  • त्यानंतर बोटांनी ती पोळी दाबा, जेणेकरुन तिची लांबी वाढेल.
  • आता ती लांबट पोळी एका दिशेला गोल फिरवून तिचे गोळे तयार करा.
  • असे ३-४ गोळे बनवून ते ५-१० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
  • पुढे गोळे व्यवस्थितपणे लाटून घ्या आणि पॅनवर टाकून शिजवा.
  • पॅनमध्ये गरम करताना त्यावर तूप टाकायला विसरु नका.
  • अशा प्रकारे झाला लच्छा पराठा तयार..

आणखी वाचा – घरच्या घरी हॉटेल स्टाईल क्रिस्पी चिली चिकन बनवून दिवस बनवा स्पेशल; लगेच नोट करा रेसिपी

तुम्ही भाजी, चटणी, लोणचं किंवा सॉस सोबत हा पराठा खाऊ शकता. काहीजण चहा पिताना हा पराठा खातात.

(ही रेसिपी Khatri’s Kitchen या यूट्यूब चॅनलवरुन घेतली आहे.)

Story img Loader