Lakshmi Pujan recipe motichoor ladoo recipe in marathi: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या लक्ष्मीपूजनाला तुम्ही देवीला नैवेद्यात मोतीचूर लाडूचा प्रसाद दाखवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतात. मात्र बरेचजण मिठाई बाहेरुन आणतात. घरी कुणी करत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ही रेसिपी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात घरच्या घरी सोप्या पद्धतीत मोतीचूरचे लाडू कसे करायचे. त्यामुळे आता दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखे परफेक्ट मोतीचूर लाडू रेसिपी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोतीचूर लाडू साहित्य

१ किलो बेसनची बुंदी
१ किलो साखर
तेल
दीड टेबलस्पून वेलची पावडर
१/२वाटी काजूचे तुकडे
१/२ वाटी मगज बी
मीठ चवीपुरते

मोतीचूर लाडू कृती

स्टेप १

सर्वप्रथम बुंदी बनवून घेण्याकरता बेसन पीठ बारीक दळून आणावे आणि ते सरसरीत भिजवून घ्यावे. त्यानंतर चिमूटभर मीठ त्यात घालावे आणि बुंदी मोतीचूरची असल्यामुळे बारीक झार्याने पाडून घ्यावी.

स्टेप २

आता बुंदी पाकात घालण्याकरता पाक तयार करण्याकरिता एक किलो साखर घ्यावी आणि साखर बुडेल एवढे पाणी घालावे मध्यम आचेवर उकळू द्यावे.

स्टेप ३

पाक साखर विरघळेपर्यंत सतत हलवावा साखरेचा पाक एकतारी असावा तोपर्यंत साखर सतत हलवत राहावे. एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करावा आणि त्यात वेलची पावडर घालून घ्यावी. सोबत केशर वेलची सिरपही घालावे असल्यास

स्टेप ४

पाक थोडा थंड झाला की त्यात तयार बुंदी घालावी आणि छान हलवून घ्यावी. वर खाली करून बुंदी हलवलेली असल्यास बुंदी छान मुरते त्यानंतर बुंदी झाकून किमान अर्धा तास तरी ठेवावे. मधून मधून हलवून पाहावे नंतर लाडू वळण्यास घ्यावे.

हेही वाचा >> दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजू कतली; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

स्टेप ५

लाडू वळताना त्याला मगज बी आणि काजू लावून लाडू बांधावेत लाडू बांधताना थोडा पाक बाजूला काढून ठेवावा. जेणेकरून पाक जास्त होऊ नये किंवा जरी पाक कमी पडला तरी तो नंतर वरून घालता येतो. जास्त पाक झाल्यास लाडू वळता येत नाही.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi pujan recipe motichoor ladoo recipe in marathi halwai style easy motichoor laddu recipe srk