आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खास करुन महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये जेवणात तोंडी लावणे हा महत्त्वाचा प्रकार. आपल्याकडे ताट वाढताना उजव्या बाजूला जितके महत्त्व असते तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच डाव्या बाजूला असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटणी, लोणचं, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. महाराष्ट्रात साधारणपणे नेहमीच्या जेवणात आपण दाण्याची, लसणाची, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची, मिरचीचा खर्डा असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार करतो. आज आपण करुयात लसणाच्या पातीचा ठेचा….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसणाच्या पातीचा ठेचा साहित्य:

  • २०-२५ लसणाची पाते किंवा १ कप लसूण पात चिरून)
  • ३ हिरव्या मिरच्या
  • १/२ कप कोथंबीर (चिरून)
  • मीठ चवीने
  • १ छोटे लिंबूरस
  • १/४ टी स्पून साखर

लसणाच्या पातीचा ठेचा कृती:

  • लसणाची पात निवडून, स्वच्छ धुवून घेणे
  • लसूण पात निवडून स्वच धुवून चिरून घ्या.
  • मग लसूण पात, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, मीठ व साखर घालून मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या.
  • मग लिंबूरस घालून परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
  • लसणाच्या पातीचा ठेचा गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा

हेही वाचा >> घरीच बनवा “काश्मिरी मिरची” पावडर; आता वर्षभर टेन्शन नाही, जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

  • ही चटणी चवीला खूप छान लागते. कशाही बरोबर खाऊ शकता. ब्रेड बरोबर तर खूपच छान लागते
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lasanachya patiche chutni garlic chutnei lasanachya paticha thecha recipe in marathi srk
Show comments