Lasuni Methi Tadka Recipe In Marathi: आज आपण सोपी पण एक आगळी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत. अनेकदा जेवणात लसूण आली की ती आपण बाजूला करतो पण या लसणाचे आरोग्याला खूप फायदे आहेत. अशाच लसणाची आज आपण रेसिपी जाणून घेणार आहोत. या रेसिपीचं नाव आहे. लसुणी मेथी. चला तर मग पाहूया लसूणी मेथीला लागणारं साहित्य…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • 150 ग्राम मेथी बारीक कटी हुआ
  • 1 बड़ा प्याज बारीक कटा हुआ
  • 2 मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 7-8 लसुण पाकळ्या उभ्या चिरलेल्या
  • 20 ग्राम भुनी हुई मूंगफली
  • २० ग्रॅम डाळ
  • 10 ग्रॅम सफेद तीळ
  • 5-6 काजुचे तुकडे
  • ५० ग्रॅम टोमॅटोची पेस्ट
  • 6-7 कडिपत्याची पाने
  • 1/4 टिस्पून इळद
  • 1-2 टिस्पून तिखट
  • 1 टेबलस्पुन धनेजिरेपावडर
  • 1 टिस्पून कसुरी मेथी
  • 1/2 टिस्पून गरम मसला
  • चविनुसार मीठ
  • 2 टिस्पून तेल
  • 4 चमचे लोणी
  • 1 टिस्पून साखर

कृती

मेथी धुवून बारीक चिरून ठेवा तसेच कांदा, मिरची, लसुण चिरून ठेवा

भाजलेले शेंगदाणे, डाळ, तिळ, काजू याची पेस्ट करून ठेवा, टोमॅटोची पेस्ट करून ठेवा

कढईत थोड्या तेलावर जीरे, ठेचलेला लसुण टाकून परतून त्यात चिरलेली मेथी परतून शिजवा व काढून ठेवा.

दुसऱ्या कढईत तेल बटर गरम करून त्यात मिरची, कडिपत्ता, ठेचलेला भरपूर लसूण सोनेरी होईपर्यंत परता.

नंतर त्यात चिरलेला कांदा मिक्स करून लालसर होईपर्यंत परता त्यातच हळद, तिखट, धनेजिरे पावडर मिक्स करा

मिश्रण चांगले परता. नंतर त्यात टोमॅटो प्युरी मिक्स करून तसेच थोडे मीठ टाकून परता.

२-३ मिनिटे झाकण ठेवून शिजवा, नंतर त्यात तयार केलेली शेंगदाणे तिळ काजूची पेस्ट तेल सुटेपर्यंत परता.

आवश्यकते नुसार पाणी, कसुरी मेथी मिक्स करून परता. नंतर त्यात परतलेली मेथी मिक्स करा चविनुसार मीठ व साखर मिक्स करा

सर्व मिश्रण झाकण ठेवून शिजवा. शेवटी त्यात गरम मसाला मिक्स करा परतून गॅस बंद करून २-४ मिनिटे झाकण ठेवा.

तडका पॅन मध्ये बटर गरम करून त्यात लसणाच्या उभ्या चिरलेल्या पाकळ्या गोल्डन होईपर्यत परता

प्लेट मध्ये लसुणी मेथी घेऊन वरून लसणाची फोडणी (तडका) पसरवून बटरचा पिस ठेवून सोबत पोळी देऊन डिश सर्व्ह करा.