तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी दूधी कोफ्ता रेसिपी घरी नक्की करून पाहा. विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊयात या खास डिशची रेसिपी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूधीचे क्रीमी कोफ्ते साहित्य

१ छोटी दूधी
१/२ कप बेसन,
१ टीस्पून जिरे,
१ टीस्पून धने पावडर,
२ मोठे टोमॅटो
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१/३ टीस्पून आल्याचा तुकडा
४ लवंग लसूण
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२,१ टीस्पून व्हेजिटेबल मसाला
क्रीम किंवा मलई घाला
आवश्यकतेनुसार स्वयंपाकाचे तेल
चवीनुसार मीठ

दूधीचे क्रीमी कोफ्ते कृती

१. प्रथम लहान आकाराची दूधी स्वच्छ करून किसून घ्यावी. नंतर बेसन घालून छान मिक्स करा. जीरे मीठ आणि गेले सर्व मसाले घालून छान गोल करुन घ्या.

२. आता कढईमध्ये तेल गरम करुन केलेले गोळे म्हणजेच कोफ्ते डीप फ्राय करुन घ्या.

३. कोफ्ते फ्राय करुन झाल्यावर ते बाहेर काढून घ्या आणि आलं लसणाची पेस्ट बनवा.

४. आता कांदा टोमॅटे आलं लसणाची पेस्ट टाकून ग्रेव्ही बनवून घ्या. झाकण ठेवून ग्रेव्ही ४-५ मिनिटे शिजवा, नंतर ग्रेव्हीमध्ये पालक कोफ्ते आणि गरम मसाला पावडर घाला.

हेही वाचा >> मसाला फ्रेंच टोस्ट; नाश्त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी नक्की ट्राय करा

५. ग्रेव्हीमध्ये दूधीपासून बनवलेले कोफ्ते झाकून ठेवा आणि ४ ते ५ मिनिटे शिजवा. कोफ्त्यांवर हिरवी कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lauki ke creamy kofta in marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi srk