तुम्ही अनेकदा कडधान्याचा विषय निघाल्यावर मटकीचं नाव आवर्जून ऐकलं असेल. कारण मटकी हे कडधान्य लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं आहे. चविला चांगली असणारी मटकी आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मटकीचा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. शिवाय मटकीपासूनही विविध पदार्थ बनवले जातात. काही जण मटकीची मिसळ करतात, तर काही मटकीची भाजी करतात.
याच मटकीपासून बनवल्या जाणाऱ्या एका वेगळ्या आणि चविष्ट पदार्थाची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती म्हणजे मटकी भजी, हो कदाचित तुम्हाला हे वाचून थोड वेगळ वाटेल पण, अनेकजण मटकीची भजी बनवतात आणि आवडीने खातात त्यामुळे आता तुम्हीही ती ट्राय करायला हरकत नाही. चला तर जाणून घेऊया मटकीची भजी बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी.
हेही वाचा- चवीला भारी आणि जेवणात रंगत आणणाऱ्या चटकदार आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जाणून घ्या
मटकी भजी करण्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे –
साहित्य –
- भिजलेल्या मटकीच जाडसर वाटण १ वाटी
- बेसन पाव वाटी
- लसूण-जिऱ्याचं जाडसर वाटण अर्धा चमचा
- ओवा पाव चमचा, मिरपूड २ चिमटी
- सैंधव चवीनुसार, तेल २ चमचे आणि बारीक चिरलेला कढीपत्ता.
हेही वाचा- दही मिरचीने जेवणामध्ये आणा तिखट झटका; पाहा अस्सल विदर्भीय रेसिपी
कृती –
वरील सर्व साहित्य त्यातील तेल वगळता एकत्र करून घ्या. त्यानंतर तेल मंद आतेवर तापवा, तेल तापलं की त्यात मध्यम आकाराची भजी तळून घ्या. कुरकुरीत भजी तयार होतील त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या. मटकी भजी खायला चविष्ट आहेतच याशिवाय ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्याचा उपयोग रुचिवर्धक म्हणून होतो.