उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक घरी उन्हाळ्याची काम सुरु होतात. घरातील स्त्रिया पापड, कुरडई, लोणची करण्यात बिझी होऊन जातात. विशेष म्हणजे घरातील इतर कामं सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच असते. मात्र, तरीदेखील या गृहिणी हसतमुखाने ही सगळं काम करतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात केलेले कुरड्या, पापड हिवाळा येईपर्यंत लगेच संपूनही जातात. त्यामुळेच आज आपण कुरड्यांच अशी एक रेसिपी पाहणार आहोत. त्यात रवा न भिजवता, चीक न पाडता झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवा कुरडई साहित्य –

अर्धा किलो रवा (कोणताही)
पाणी, मीठ
कुरडईचा साचा
पापड खार

रवा कुरडई कृती-

१. अर्धा किलो रवा एका भांड्यात घेऊन तुम्हाला कणकेप्रमाणे रवा मळून घ्यायचा आहे. हा गोळा साधारण 10 तास तसाच तिंबून ठेवायचा आहे.

२. साधारण ८ ते १० तासानंतर तुम्हाला चीक काढायचा आहे. चीक काढण्यासाठी तयार गोळा पाणी घालून फोडून घ्या. एक दुसरे भांडे घेऊन तुम्हाला त्यातून चीक काढायचा आहे.

३. चीक काढणे म्हणजे तुम्हाला पातळ जाळी घेऊन त्यातून पाणी काढायचे आहे. तुम्ही ज्यावेळी चीक काढाल त्यावेळी तुम्हाला उरलेल्या रव्याचा गोळा अगदीच रबरासारखा वाटेल. जो पर्यंत त्यातून पांढरे पाणी येत आहे तो पर्यंत त्यात चीक आहे असे समजावे.

४. पाणी स्वच्छ निघाले की, आता त्यातून चीक निघणार नाही,असे समजावे.

५. काढलेला चीक रात्रभर तसाच ठेवून द्यावा.सकाळी अलगद उघडून वर आलेले पाणी काढून टाकावे. त्याच्या तळाशी चीक आलेला असतो. तो तुम्हाला कुरडईसाठी वापरायचा आहे. चीक निघून जाईल इतकेही पाणी काढू नका.

६. आता तुम्हाला चीक मोजून घ्यायचा आहे. जितका चीक, तितकेच पाणी असे त्याचे प्रमाण असणार आहे. एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापड खार टाकायचे आहे.

हेह वाचा >> या उन्हाळ्यात बनवा फक्त १ कप तांदळाच्या ७० पापड्या; तिप्पट फुलणारे वाफेवरील तांदळाचे सालपापड

७. पाण्यात चीक घालून ते सतत ढवळत राहा. त्याच्या गुठळ्या होता कामा नये. जर आवश्यक असेल तर पाणी घाला. तुमचा चीक तयार तुम्हाला कुरडईच्या साच्यात घेऊन तुम्हाला कुरडई पाडून घ्यायच्या आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn how to cook instant rava kurdai at home crunchy delicious and worth trying summer special recipe in marathi srk