पावसाळ्यात भाज्या आणि मासे तुरळक असण्याच्या काळात कामाला येतं ते वाळवण. भाज्यांचा सुकाळ नसणाऱ्या या दिवसांत घरातल्या कडधान्यांपासून डाळीपर्यंत, कोहळ्यापासून दहीमिठाचाही मुबलक वापर करून असंख्य प्रकारच्या वाळवणांची जय्यत तयारी या दिवसांत केली जाते. हे अस्संच उन्ह वाळवणांसाठी लागतं खरं. पण शहरात हे सगळं कठीणच..मात्र आजा आम्ही तुमच्यासाठी वाळवणाची खास रेसिपी आणली आहे. तांदळाच्या सालपापड्या कुरकुरीत, खुसखुशीत असा पापडाचा प्रकार म्हणजे तांदळाच्या सालपापड्या…. लहानपणीच्या पापडाच्या अनेकांच्या आठवणी असतील. म्हणजे तुम्हीही कधी कोणाच्या घरी जाऊन उडदाचे पापड लाटले असतील. पण आज आपण थोडे वेगळा पापड पाहूया. याला तांदळाच्या सालपापड्या म्हणतात कारण ते सालीसारखे काढून मग वाळवले जातात.
तांदळाच्या सालपापड्या साहित्य-
१. १ कप तांदूळ
२. जीरे
३. मीठ
४. पाव चमचा पापड खार
तांदळाच्या सालपापड्या कृती
१. दोन दिवस तुम्हाला तांदुळ भिजत ठेवायचे आहेत. कुरडईप्रमाणे तुम्हाला त्याचे पाणी बदलायचे आहे.
२. दोन दिवसांनी तांदुळ धुवून तुम्हाला तांदुळ मिक्सरमधून काढायचे आहेत. त्यात कणी राहता कामा नये.
३. तयार तांदळाच्या वाटपात थोडे मीठ घालायचे आहे. साधारण डोशाच्या पिठासारखी याची कन्स्टन्सी हवी.
४. त्यात तुम्ही जीरे घाला.पाव चमचा पापड खार खालून मिश्रण एकजीव करा.
५. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. आता सालपापड्या करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला हे बॅटर शिजवून पापड लाटायचे नाही.
६. तर तुम्हाला एका ताटाला तेल लावून त्यावर बॅटर तुम्हाला ते डोशासारखे सोडायचे आहे. पातळ करुन तुम्हाला ते ताट गरम पाण्यावर ठेवायचे आहे.
हेही वाचा >> झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे
७. थोड्या कडा सुटायला लागल्यावर ताट उलट करुन आतल्या बाजूला पापड करुन ठेवायचा आहे. साधारण मिनिटभऱ ठेवून ते पाण्यातून काढून सुरीच्या साहाय्याने पापड काढायचा आहे. आणि वाळण्यासाठी ठेववून द्यायचा आहे.
८. तुम्ही इडलीपात्रातही पापड शिजवू शकता. त्याप्रकारेही चांगले होतात.