महाराष्ट्रात तसे अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत. तरीही थालीपीठ या पदार्थाबाबत महाराष्ट्रीतील लोकांना एक वेगळच आकर्षण आहे. तो खाद्यपदार्थ राज्यभरातील लोक अतिशय आवडीने खातात. राज्यासह देशातील अनेक भागात थालीपीठ बनवले जाते. थालीपीठ हा आवडीने खाल्ला जाणारं एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. तो पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी, बेसन वापरतात. मात्र, आम्ही आज तुम्हाला तांदळाचं थालीपीठ कसं बनवायचं याबाबतची रेसिपी आणि त्यासाठी लागणारं साहित्य लागतं याबाबतची माहिती सांगणार आहोत. तांदळाचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे.
हेही वाचा- रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर झणझणीत झुणका एकदा बनवाच, जाणून घ्या सोपी रेसिपी
साहित्य –
- तांदळाचं पीठ एक वाटी
- बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
- बेसन दोन चमचे
- खोवलेलं खोबरं अर्धी वाटी
- आंबट दही दोन चमचे
- पाच-सहा हिरव्या मिरच्या
- चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
- मीठ (चवीनुसार)
थालीपीठ बनवण्याती कृती –
सर्वात आधी ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून घ्या, त्यानंतर पसरट बाऊलमध्ये तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ (बेसन), कांदा, दही घाला. नंतर वाटून घेतलेलं खोबरं, मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर तेल घालून सगळं नीट मिसळून घ्या आणि आवश्यकता वाटल्यास त्या मिश्रणामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला.
हेही वाटा- पोळ्या रात्रीपर्यंत मऊ-लुसलुशीत राहण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
तव्याला तेलाचा हात लावून पातळ थालीपीठ थापा. झाकण ठेवून नेहमीप्रमाणे खमंग थालीपीठ करून घ्या. थालीपीठ तयार झाल्यानंतर ते तूप किंवा लोणच्यासह घरच्या मंडळीना खायला देऊ शकता. तुम्हालाही नाश्त्यात थालीपीठ बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.