हिंदू संस्कृतीत बेल या वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्च आहे. श्रावण महिना सुरु झाला अनेकांच्या डोळ्यापुढे बेलाचे झाड येते. बेल या वृक्षाला जसं धार्मिक महत्व आहे. तसेच किंबहुना त्याहून अधिक बेलाचे फळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बेलाचे फळ पिकल्यानंतर गराचा सुगंध आणि चव देखील छान असते.

बेलफळातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. बेलफळापासून वेगवेगळे पदार्थ करता येतात. शिवाय बेलाचे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याच्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही अगदी बिनधास्तपण खाऊ शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला बेलाच्या फळापासून बनवली जाणारी अनोखी अशी रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे बेलफळाचा जॅम. चला तर मग या जॅमसाठी लागणारे साहित्य आणि तो बनवण्याची कृती जाणून घेऊया.

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
Health Food
Health Special: हिवाळ्यात अहिम भोजन योग्य’, म्हणजे नेमकं काय?

हेही वाचा- २ बटाट्यांचे २०० पापड बनतील, ‘ही’ पळी पापड ट्रिक आहेच भन्नाट; तिप्पट फुलतात व वर्षभर पुरतात

साहित्य –

  • पिकलेली बेलफळं २
  • साखर दीड कप
  • सायट्रिक अॅसिड अर्धा चमचा

कृती –

हेही वाचा- नाश्त्यात बनवा झटपट तयार होणारी ‘बाजरीची लापशी’; जाणून घ्या सोपी रेसिपी

बेलफळं फोडून त्यातला गर बाजूला काढा. बिया आणि चोथ्याचा भाग बाजूला काढण्यासाठी पुरणाच्या गाळणीवर चमच्याच्या मदतीनं दाबून गर वेगळा करा. निघालेला गर भांड्यात घेऊन मंद आचेवर गरम करा आणि तो सतत ढवळत राहा. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या प्रमाणात साखर घाला आणि ते सतत ढवळत राहा. त्यानंतर त्यामध्ये सायट्रिक अॅसिड घाला, ज्यामुळे त्याला आंबटसर चव येईल. हे मिश्रण सतत ढवळायला विसरु नका.

परीक्षण पद्धत –

थोडा जॅम एका ताटलीवर घेऊन ताटली वाकडी करा. जर त्यातून पाण्याचा ओघळ आला तर जॅम अजून व्हायचा बाकी आहे असं समजावं. जॅम तयार झाल्यावर ओघळ न येता जॅम तसाच ताटलीवर राहतो.

उपयोग –

पिकलेली बेलाची फळं ही अत्यंत पित्तशामक असतात. त्यानं पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते. शरीराची होणारी आग आग कमी होते.

Story img Loader