Bread Yummy Recipe: अनेकदा नाश्त्यासाठी आणलेले ब्रेड उरतात, अशावेळी त्यांचं काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच. अशावेळी तुम्ही त्या ब्रेडपासून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता. आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही उरलेल्या ब्रेडपासून गुलाबजाम, उपमा असं काहीना काही बनवलं असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला फोडणीचा टेस्टी ब्रेड कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

१. उरलेले ब्रेड
२. १ चिरलेला बारीक कांदा
३. १ चमचा लाल तिखट किंवा ४-५ मिरच्या
४. १/२ चमचा जिरे
५. १/२ चमचा मोहरी
६. चिमूटभर हिंग
७. १/४ चमचा हळद
८. कोथिंबीर
९. चवीनुसार मीठ
१०. तेल आवश्यकतेनुसार

कृती :

हेही वाचा : उडीद आणि तांदळाचे नाही, यंदा बनवा उन्हाळा स्पेशल ‘नाचणीचे पापड’; लिहून घ्या साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी उरलेले ब्रेड हाताने मोठेमोठे कुस्करून घ्या. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घाला.

२. आता एका गरम कढईत तेल ओता व त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, चिरलेला कांदा आणि लाल तिखट किंवा मिरच्या घालून व्यवस्थित परतून घ्या.

३. कांदा जरा लालसर झाल्यावर त्यात कुस्करलेला ब्रेड घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

४. नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ काढून घ्या.

५. तयार गरमागरम फोडणीचा ब्रेड तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leftover bread then try tadka bread yummy recipe note down how to make sap
Show comments