Leftover Rice Recipe: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात ठरलेले पदार्थ म्हणजे वरण-भात आणि पोळी भाजी. पण, कधी तरी ऑफिसवरून येताना मित्र-मैत्रिणींबरोबर खायला जायचा प्लॅन झाला की, मग घरात बनवलेलं जेवणं उरते. मग रात्री उरलेला शिळा भात सकाळी फोडणी देऊन खाल्ला जातो किंवा आपण शक्यतो तो फेकून देतो. पण, अन्न वाया न जाता, भात फेकून न देता त्यापासून एखादा खास पदार्थ बनवता आला तर… आज आपण उरलेल्या भातापासून एक अनोखी रेसिपी (Leftover Rice Recipe) बनवणार आहोत. यासाठी तुम्हाला काही मोजकं साहित्य लागेल. चला तर पाहुयात साहित्य आणि कृती…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

१. रात्री उरलेला भात
२. मक्याचे पीठ
३. भोपळी मिरची
४. मशरुम
५. मिरपूड
६. चिली फ्लेक्स
७. शक्य असल्यास व्हाईट सॉस
८. तेल
९. मीठ

हेही वाचा…Healthy Nachani Dhokla Recipe: नाचणीची भाकरी नाही आज नाश्त्याला करा नाचणीचा पौष्टिक ढोकळा; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या

कृती –

१. मिस्करच्या भांड्यात उरलेला भात घ्या.
२. त्यात थोडं तेल आणि मक्याचे पीठ घाला.
३. मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या.
४. तयार मिश्रणाचे गोळे करून घ्या.
५. पिठाच्या गोळ्यांची एक गोलाकार वाट्या बनवून घ्या. जसं आपण मोदकात सारण भरतो अगदी त्याप्रमाणे. (तुम्ही याला तुमच्या आवडता आकार सुद्धा देऊ शकता) .
६. सात ते आठ मिनिटे गोलाकार वाट्या वाफेवर शिजवून घ्या.
७. नंतर यामध्ये सारण भरण्याची तयारी करायला घ्या.
८. पॅनमध्ये तेल घ्या. त्यात भोपळी मिरची, मशरुम, परतवून घ्या.
९. नंतर त्यात शक्य व्हाईट सॉस. नंतर मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स घाला.
१०. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
११. तयार केलेल्या गोलाकार वाटीत हे मिश्रण भरून घ्या.
१२. अशाप्रकारे रात्री उरलेल्या भातापासून तुमचा नवीन, खास चमचमीत पदार्थ तयार.

सोशल मीडियाच्या या @agarnishbowl इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी घेण्यात आली आहे.

शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर :

तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर का आपण भात शिजवून थंड करून ठेवला व तो काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ला तर यामुळे भातातील स्टार्च व ग्लाइसेमिक इंडेक्स कमी होऊन केवळ साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते किंवा जर तुम्हाला रात्रीचा उरलेल्या भात दुसऱ्या दिवशी खायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी (Leftover Rice Recipe) करून पाहू शकता. सतत फोडणीचा तेलकट भात खाऊन आपल्यातील अनेकांना कंटाळा येतो . त्यामुळे हा पर्याय आपल्या सगळ्यांसाठीच बेस्ट ठरेल असेल म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leftover rice recipe in marathi delicious ways to use leftover rice note down the perfect way to reuse rice and save food asp