Leftover rice Recipe: रोज रोज ताजे व शिजलेले अन्न खावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. पण, कधी कधी स्वयंपाक बनवताना अंदाज चुकला तर एखादा पदार्थ उरतो. पोळी उरली की त्याचा पराठा, भात उरला तर तो सकाळी फोडणी देऊन खाल्ला जातो. पण, तुम्ही सारखेच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. या खास पदार्थाचं नाव आहे ‘क्रिस्पी राईस स्नॅक्स’. चला तर मग जाणून घेऊ या क्रिस्पी राईस स्नॅक्सची सोपी रेसिपी.
साहित्य
उरलेला भात
अर्धा पातेलं दही
अर्धा पातेलं तांदळाचं पीठ
पाणी
१ चमचा लाल तिखट
१ चमचा ओरेगॅनो
१ चमचा मीठ
जीरा
कोथिंबीर
बेकिंग सोडा
क्रिस्पी राईस स्नॅक्स रेसिपी
प्रथम एका मिक्सरमध्ये उरलेला भात घ्या आणि ३-४ चमचे पाणी घालून भात चांगला बारीक करून घ्या.
त्यात अर्धा पातेलं दही, अर्धा पातेलं तांदळाचं पीठ, पाणी, १ चमचा लाल तिखट, १ चमचा ओरेगॅनो, १ चमचा मीठ, जीरा, कोथिंबीर, बेकिंग सोडा आणि पाणी घाला.
याची एक गुळगुळीत पेस्ट तयार करा.
गरम तेलात तळा.
तुमचे क्रिस्पी राईस स्नॅक्स तयार आहेत. आनंद घ्या!
हेही वाचा… Dahi Kabab Recipe: अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘दही कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या
पाहा VIDEO
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.