के नायडू

साहित्य

गवती चहाच्या चार ते पाच काडय़ा

लिंबू रस दोन टीस्पून

जस्मिन टी बॅग १

लिची ज्यूस

व्हॅनिलाचा रसाचे काही थेंब

बर्फाचे चौकोनी तुकडे ५ ते १०

कृती

मॉकटेल शेकरमध्ये गवती चहाच्या काडय़ा वाटून घ्या. गरम चहाच्या कपामध्ये लेमन टीची बॅग मिसळा. त्यात लिंबू रस, व्हॅनिला रसाचे थेंब आणि लिची ज्यूस मिसळा आणि हे मिश्रण बर्फात घुसळून घ्या. हायबॉल ग्लासमध्ये हे मिश्रण ओतून ते सजविण्यासाठी पुदिन्याची पाने लावून सव्‍‌र्ह करा.