Lemon Peels Chutney: बहूतेक भारतीय पदार्थ फूड्समध्ये लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाचा रस चयापचयासाठी फायदेशीर आहेच त्याचबरोबर जेवणाची देखील चव वाढवितो. साधारणत: लिंबाची साल फेकून दिले जाते पण तुम्हाला माहिती आहे का? सालीची चविष्ट आणि आरोग्यदायी चटणी तयार केली जाऊ शकते. लिंबाच्या सालची चटणी दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये देखील खाल्ली जाऊ शकते. लिंबाची साल देखील व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते जे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करते. लिंबाचे सालीची चटणी तोडांचे आरोग्य राखण्यास मदत करते असे मानले जाते.
लिंबूच्या सालीची चटणी जेवणाची चव वाढवते. तुम्ही जर कधी लिंबाची सालीची चटणी खाल्ली नसेल तर आम्ही सांगितलेले सोपी पद्धतीने तुम्ही सहज घरच्या घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊ या, लिंबाची सालीची चटणी तयार करण्याची रेसिपी.
लिंबाच्या सालीच्या चटणीसाठी साहित्य
लिंबाची साल – १/२ कप
हळद – १/२ टीस्पून
जिरे – १/२ टीस्पून
साखर – १ टीस्पून
तेल – १ टीस्पून
मीठ – १/२ टीस्पून
हेही वाचा : उकाड्याने हैराण झालाय? मग शरीराला थंडवा देणारं बडीशेप सरबत प्या, जाणून घ्या सोपी रेसिपी
लिंबाच्या सालीची चटणी कशी बनवायची
लिंबाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी प्रथम लिंबाचे चार तुकडे करा. यानंतर एका भांड्यात लिंबाचा रस काढून बिया वेगळे करा. आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. भांड्यावर एक चाळणी ठेवा, ज्यावर रस काढला आहे त्यावर लिंबाची साले पसरवा आणि चाळणी झाकून ठेवा. यानंतर, लिंबाची साल चांगली शिजेपर्यंत वाफेवर शिजवा. या पद्धतीने लिंबाच्या सालीचा कडूपणाही जवळजवळ संपतो.
हेही वाचा : हेल्दी आणि टेस्टी मखाणा डोसा! मुलांच्या डब्यासह नाष्ट्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ, जाणून घ्या रेसिपी
लिंबाची साल मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि सालं थंड होण्यासाठी ठेवा. काही वेळाने लिंबाची साले थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाका आणि वर थोडे मीठ टाका आणि साले बारीक वाटून घ्या. आता एका कढईत १ टीस्पून तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून परतून घ्या. त्यानंतर काही वेळाने लिंबाचे बारीक वाटलेले मिश्रण घालून त्यात चवीनुसार हळद, साखर आणि मीठ एकत्र करून तळून घ्या. २ मिनिटे शिजल्यानंतर चविष्ट लिंबाच्या सालीची चटणी तयार होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)