Diwali 2023 Recipes : दिवाळीच्या फराळामध्ये लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंजी असे विविध पदार्थ असतात. प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ वेगळा असतो. तुम्हाला जर कुरकरीत शेव खायला आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. शेव नुसती खायला अनेकजणांना आवडतेच पण त्याचबरोबर चिवड्यासाठी अथवा शेवचे लाडू तयार करण्यासाठी शेव तयार केली जाते. शेव तयार करणे तसे सोपे काम आहे पण तिला कुरकुरीतपणा आला तर खरी मजा येते. चला तर मग आज शेव तयार करण्याची रेसिपी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • १/४ कप पाणी
  • १/४ कप तेल
  • चवीपुरते मिठ
  • १/२ ते ३/४ कप बेसन (मावेल इतपत घालावे)
  • १/४ टिस्पून हळद
  • १/२ टिस्पून ओव्याची पुड
  • तेल तळण्यासाठी

हेही वाचा- साखरेच्या पाकाशिवाय कसे बनवावे रव्याचे लाडू? तोंडात टाकताच विघळून जातील, जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती

  • तेल, ओवापुड आणि पाणी एकत्र करून फेटून घ्यावे. नीट एकजीव होवू द्या. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि हळद घालून एकत्र करा.
  • यामध्ये चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बऱ्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये.
  • सोऱ्यामध्ये बारीक शेवेची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
  • कढईत तेल गरम करायला ठेवावे. मिश्रण सोऱ्यामध्ये गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी. म शेव तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवेचा रंग बदलतो.
  • तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. नंतर शेव हलक्या हाताने चुरडून घ्यावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love eating crunchy sev now make it at home not down the besan sev recipe snk