तुम्हाला चाट खायला आवडते का? चटपटीत आंबट, गोड, तिखट चाट खाण्यासाठी तुम्ही नेहमी तयार असता मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आज हटके चाटची रेसिपी सांगणार आहोत. भाकरी चाट रेसिपी ही एक चविष्ट आहे. ही चाट रेसिपी तुमच्या मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल अशी आहे. भाकरी चाट कसा बनवायचा जाणून घेऊ या…

साहित्य

भाकरीच्या पिठाची कणिक मळण्यासाठी साहित्य
१ कप मिक्स मिठ करा
१ टीस्पून कॅरम बिया (ठेचून)
१/४ कप कोथिंबीर पाने (चिरलेली)
१ टीस्पून कच्चा आंबा पावडर
१/४ कप पुदिन्याची पाने
मीठ (चवीनुसार)
१ टीस्पून तेल
पाणी (आवश्यकतेनुसार)
१ टीस्पून तेल

तळणे
तेल (तळण्यासाठी)

हेही वाचा – Diwali Faral Recipe : दिवाळीत नेहमीच्याच चकल्यांपेक्षा ट्राय करा ‘हे’ पाच वेगळे प्रकार; कुरकुरीत अन् चवीलाही भारी

स्टफिंगसाठी
१/२ कप दही
२ चमचे पांढरा मुळा (किसलेला)
२ चमचे टोमॅटो (चिरलेला)
२ चमचे कांदा (चिरलेला)
२ चमचे पांढरे मुळ्याची पाने (चिरलेली)
१ टीस्पून कोथिंबीर पाने (चिरलेली)
१ टीस्पून पुदिन्याची पाने (चिरलेली)
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ (चवीनुसार)

चाटची तयारी
चीज स्लाइस
कॉर्न (उकडलेले)
डाळिंब
शेंगदाणे
हिरवी चटणी
गोड चटणी
मसालेदार हरभरा डाळी
सेव्ह
चाट मसाला
कोथिंबीर

हेही वाचा – Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी भाजणीचे योग्य प्रमाण; वाचा परफेक्ट रेसिपी

भाकरी रेसिपी कृती

प्रथम एक वाटी ज्वारीचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी तांदळाचे पीठ आणि एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन मिक्स पीठ तयार करा.

आता एका भांड्यात तयार मिक्स पिठाचा एक कप घ्या. त्यात ओवा, कोथिंबीर, आमचूर पावडर, बारीक चिरलेला पुदीना आणि मिठ घालून पिठ एकत्र करा, त्यात एक चमचा तेल टाका आणि गरजेनुसार पाणी वापरून कणीक मळून घ्या.थोडसं तेल टाकून चांगले मळून घ्या. आता तयार पिठाची पोळी लाटून घ्या त्याच्या छोट्या पुऱ्या करून घ्या.
साधारण एका पोळीमध्ये पाच ते सहा पुऱ्या तयार होतात. आता त्यावर काटे चमच्याने बीळ पाड म्हणजे पुरी तळताना फुगणार नाही.
तयार पुऱ्या गरम तेलात टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. भाकरीच्या पुऱ्या तयार आहेत.

आता एका भांड्यात दही घ्या, त्यात मुळा, टोमॅटो, कांदा, चिरलेली मुळ्याची पाने, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदीना, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करा. चाटसाठीची कोशिंबीर तयार आहे.

आता तयार पुऱ्या एका ताटात ठेवा. छोटे चौकोनी आकारात चीज कापून ते पुरीवर ठेवा आता त्यावर तयार कोथिंबीर ठेवा. आता त्यावर वाफवलेले मक्याचे दाणे, डाळींबाचे दाणे, शेंगदाणे, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, तिखट डाळ, चाट मसाला, शेव आणि कोथिंबीर टाका. तुमचे भाकरी चाट तयार आहे.

हेही वाचा – Diwali Special Chakli Recipe : नेहमीच्या चकलीला द्या थोडा ट्विस्ट, यंदा दिवाळीत बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली; वाचा साहित्य, कृती

हेही वाचा – चिवडा नरम होतो? या ३ टिप्स वापरा शेवटपर्यंत राहील कुरकुरीत; ही सोपी रेसिपीही करा नोट

या पुऱ्या तुम्हा तयार करून हवा बंद ड्ब्यात साठवू शकता आणि सायंकाळच्या नाष्ट्याच्या वेळी भाकरी चाट खाण्याचा आनंद घेऊ शकता.