Lauki Sabji or Bhaji Recipe: भोपळ्याची भाजी म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खायचा कंटाळा करतात. पण दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने खाणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता. दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. कोणाला न आवडणारी दुधी भोपळ्याची आंबट गोड भाजी सुद्धा सगळे आवडीने खातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भोपळ्याची आंबट गोड भाजी साहित्य

मेथी दाणे
तमालपत्र
कलौंजी
ताजा भोपळा
मीठ, लाल तिखट, हळद
धणे पूड, गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर आणि साखर घ्या.
भाजीला तडका देण्यासाठी आपल्या आवडीचे तेल घ्या.
मोहरीच्या तेलातील भाजी टेस्टी लागते.

भोपळ्याची आंबट गोड भाजी कृती

ही भाजी बनवण्यासाठी कढई घेऊन त्यात तेल गरम करावे. गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, कलौंजी आणि मेथी दाणे घालावे. आणि नंतर थोड्या पाण्यासोबत मीठ, लाल तिखट, हळद, धणे पूड घाला.

मसाले चांगले भाजून घ्यावेत. आणि मग त्यात भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे टाकून मिक्स करा. नंतर थोडा वेळ झाकून ठेवा. भोपळा झाकल्यानंतर किमान ७-१० मिनिटांत शिजतो.

तपासून मग त्यात गरम मसाला, आमचूर पावडर आणि साखर घालून मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर पुन्हा झाकून घ्या. साखर ३ ते ५ मिनिटांत विरघळेल. नंतर झाकण काढून भाजी एकदा ढवळा.

हेही वाचा >> Sandwich Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा दही सँडविच; एकदम सोपी आहे रेसिपी

आता कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.