Maggie Dosa Recipe : मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही मॅगीचा कधी डोसा खाल्ला आहे का? हो, मॅगी डोसा. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मॅगी डोसा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर दर दिवशी अनेक नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपीचे व्हिडीओ अचंबित करणारे असतात. हा मॅगी डोसाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही अगदी सोपी रेसिपी आहे. जाणून घेऊ या मॅगी डोसा कसा बनवायचा? (Maggie Dosa Recipe do you ever eat Maggie dosa to know recipe of Maggie dosa watch viral video)

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • मॅगी
  • तांदळाचे पीठ
  • रवा
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेला टोमॅटो
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • मॅगी मसाला
  • आल्याची पेस्ट
  • पाणी
  • तेल किंवा तूप

हेही वाचा : Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या

balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल
a little child girl made a tasty ukdiche modak
Video : चिमुकलीने बनवले बाप्पासाठी सुंदर मोदक, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pune Ganeshotsav 2024
Pune Video : पुण्यात गणपती बघायला जाताय? मग हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
st bus video viral
सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले, प्रवासी अन् कंडक्टर पाहतच राहिले, एसटी बसचा Video होतोय व्हायरल
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
St driver wrote on bus bonnet | St bus Viral Video | MSRTC bus
एसटी बसचालकाने बोनेटवर लिहिले असे काही की… तुम्ही चुकूनही त्यावर पाय ठेवणार नाही, Video एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

कृती

  • सुरुवातीला मॅगी चे बारीक तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
  • त्यानंतर मॅगीचे पावडर तयार होईल.
  • या मॅगीच्या पावडरमध्ये तांदळाचे पीठ टाका आणि रवा टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
  • बारीक चिरलेला टोमॅटो टाका
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका
  • आल्याची पेस्ट व चिली फ्लेक्स टाका.
  • चवीनुसार मॅगी मसाला टाका
  • बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  • आणि शेवटी पाणी टाका
  • हे मिश्रण एकजीव करा आणि पातळ मिश्रण तयार करा.
  • गॅसवर एक तवा ठेवा.
  • तव्याला तेल किंवा तूप लावा आणि त्यावर हे मिश्रण टाका.
  • दोन मिनिटे हा मॅगी डोसा शिजवून घ्या.
  • तुमचा मॅगी डोसा तयार होईल.

हेही वाचा : नावडती तोंडली होईल सर्वांची आवडती; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “काजू तोंडली मसाला” भाजी

homecheff_renu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मॅगी डोसा” या व्हिडीओच्या अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आगळी वेगळी रेसिपी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान मी नक्की हा पदार्थ बनवणार.”

यापूर्वी सुद्धा अशा अनेक अनोख्या रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. काही रेसिपी नेटकऱ्यांना आवडतात तर काही रेसिपींवर नेटकरी टीका करतात. काही महिन्यांपूर्वी बार्बी गुलाबी रंगाची बिर्याणी रेसिपीची चांगलीच चर्चा रंगली होती.