महाराष्ट्रात वांगी खाण्याचा खवय्यावर्ग तसा फार मोठा नाही. पण वांग्याची भाजी, भरली वांगी, वांग्याचं भरीत, वांग्याची भजी यासह इतर पदार्थांमध्ये वांग्याचा वापर आपण करतो, आणि चवीने खातो. वांगी खाल्ल्याने आरोग्याला फायदाच होतो. पण तरीही बरेच जण वांग्याचे पदार्थ खाताना नाकं मुरडतात. वांग्याचे नानाविध प्रकार आपण खाल्ले असतील, पण कधी भरली वांगी सोडे घालून खाल्ली आहे का? नाही ना मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. भरली वांगी सोडे घालून खूप टेस्टी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भरली वांगी सोडे घालून साहित्य

४ वांगी
१ बटाटा
२ मध्यम आकाराचे कांदे
१/२ वाटी सोडे
३ हिरव्या मिरच्या
८-१० लसूण पाकळ्या मूठभर कोथिंबीर
आल
४ चमचे तेल
१ चमचा संडे मसाला
१/२ चमचा हळद
२ लवंगा
१ वेलची
थोडीशी दालचिनी
१/२ चमचा धणे
चिमूटभर बडिशेप
१/२ वाटी खोबर
चवीनुसार मीठ

भरली वांगी सोडे घालून कृती

१. प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर वांग्याला मधे चार चिरा पाडून पाण्यांत घालून ठेवावीत. बटाट्याच्या फोडी करून ठेवाव्यात. २ कांदे बारीक चिरून ठेवावेत.

२. नंतर १ कांदा उभा चिरून ठेवावा व चमचाभर तेलावर कांदा खोबर, लवंग, वेलची, दालचिनी,धणे, बडीशेप भाजून तसेच सोड्यांपैकी निम्मे सोड तळूने याचे वाटण वाटून ठेवावे.

३. राहीलेले सोडे धुवून त्याला आल, लसूण, मिरची कोथिंबीरीचे वाटण, हळद, संडे मसाला व मीठ लावून ठेवावेत

४. नंतर एका भांड्यात २ चमचे तेल तापवून त्यांत एक बारीक चिरलेला कांदा घालून त्यावर सोडे परतवून घ्यावेत कांदा
खोब-याच्या वाटणांत मिसळवावे.

५. नंतर सोडे परतलेल्या कढईत २चमचे तेल तापवून त्यांत एक कांदा परतवावा व तयार केलेले सोडे खोब-याचे मिश्रण, चविनुसार मीठ घालून मसाला वांग्यामधे भरवून कढईत लावून घ्यावी. उरलेला मसाला कढईत घालून १/२कप पाणी घालून झाकण देवून वांगी शिजवत ठेवावी.

हेही वाचा >> पावसाळ्यात असा चमचमीत मसालेदार ‘खिमा पाव’ घरी केल्यावर हॉटेलचं खाणं विसरून जाल; नोट करा सोपी रेसिपी

६. नंतर या तयार झालेल्या वांग्यावर चिरलेली केथिंबीर घालून सर्व्ह करावे.