थालीपीठ हा मराठमोठा पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे. थालीपीठला नुसतं बघून तोंडाला पाणी सुटतं. खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काकडीचे पौष्टिक थालीपीठ करू शकता. काकडीचे थालीपीठ बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. ही रेसीपी नोट करुन तुम्ही घरच्या घरी टेस्टी थालीपीठ झटपट बनवू शकता
साहित्य :
काकडीचा किस
दाण्याचा कूट
गव्हाचे पीठ
चिरलेली कोथिंबीर
हिरव्या मिरच्यांचा ठेचा
चवीपुरते मीठ
तूप/तेल
हेही वाचा : Pani Puri : पावसाळ्यात बाहेरची पाणी पुरी खाऊ नका; घरीच बनवा पाणी पुरी, ही सोपी रेसिपी नोट करा
कृती :
काकडी सोलून किसावी.
किसल्यावर त्यातील पाणी काढू नये.
त्यात थोडे मीठ टाकावे.
त्यानंतर त्यात दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करावे.
या मिश्रणात गव्हाचे पीठ टाकावे आणि थोडे पाणी टाकावे.
आणि डोसाच्या मिश्रणाप्रमाणे पातळ मिश्रण तयार करावे
गरम तव्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप टाकावे
आणि त्यावर हे काकडीचे मिश्रण डोसासारखे पसरावे
मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे.
थालीपीठ भाजताना कडेने थोडे तूप किंवा तेल सोडावे.
लोणच्याबरोबर काकडीचे थालीपीठ खूप चविष्ट लागतात.