सतत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. विकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत हवं असतं. अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची तूर आणि वालाची खिचडी. चला तर पाहुयात याची सोपी मराठी रेसिपी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूर आणि वालाची खिचडी साहित्य

१ वाटी तूर आणि वालाचे दाणे
१ बटाटा
१ टोमॅटो
२ कांदे
१ समजा आले लसूण भरडा
१ चमचा बारीक कापलेली कोथिंबीर
२ पळी तेल
१/२ चमचा जीरे फोडणीसाठी
१ तमालपत्र
२ लवंगा,३ काळी मिरी दालचिनीचा छोटासा तुकडा
मीठ चवीनुसार
१ वाटी वाडा कोलम तांदूळ
१/२ चमचा हळद
१ चमचा संडे मसाला

तूर आणि वालाची खिचडी कृती

१. प्रथम वालाचे दाणे आणि तुरीचे दाणे स्वच्छ धुऊन घ्यावेत. बटाट्याच्या मोठ्या फोडी कापून घ्याव्यात. कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

२. नंतर छोट्या कुकरमध्ये तेल टाकून फोडणीसाठी जीरे त्याचप्रमाणे लवंग काळीमिरी तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकावा. त्यानंतर कांदा परतून घ्यावा, त्यात आलं लसणाचे वाटण छान परतून घ्यावं.

३. नंतर टोमॅटो परतून घ्यावा, हळद, मिरची पावडर घालावी, तीही परतून घ्यावी. नंतर तांदूळ घालून दोन तीन मिनिटं सर्व साहित्य नीट परतून घ्यावे. एका बाजूला पाणी गरम करत ठेवावे.

४. पाण्याला एक उकळी आल्यावर ते खिचडीच्या साहित्यावर टाकून गरजेप्रमाणे मीठ घालून एक उकळ येऊ द्यावी.

हेही वाचा >> Banana Muffins: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा केळीचे मफिन्स, जाणून घ्या सोपी रेसिपी!

५. नंतर कुकर बंद करून मंद गॅसवर दहा मिनिटे ठेवावे. कुकर उघडल्यानंतर बारीक कोथिंबीर घालून गरमागरम खिचडी लिंबूच्या आंबट गोड लोणच्या बरोबर सर्व्ह करावी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrian khichdi recipe in marathi tur dal ani val khichdi recipe in marathi srk