ज्या महिलांना रोज वेगळी काय भाजी करायची किंवा विकेंडला काय मेन्यू करायचा असा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी गावरान पद्धतीची थोडी झणझणीत पण अतिशय चविष्ट अशी मासवडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारी ही मासवडी अतिशय चविष्ट लागत असल्याने घरी कोणी पाहुणे येणार असतील तरी आपण हा बेत आवर्जून करु शकतो.
मासवडी रस्सा साहित्य
- सारण
- १ वाटी किसून भाजून घेतलेले सुके खोबरे
- १/२ वाटी भाजून घेतलेले तीळ
- १ चमचा भाजलेली खसखस
- तळुन घेतलेला कांदा 1(मध्यम)
- १०-१२ लसुण पाकळ्या
- चवीप्रमाणे मीठ
- आवरण
- १/४ चमचाहींग
- १/२ चमचा हळद
- १ टेबलस्पून हिरवी मिर्च आणि लहसुन यांचा ठेचा /लाल तिखट
- २ वाटी चाळुन घेतलेले बेसन पीठ
- २ वाटी पाणी
- मीठ
- तेल
- मासवडी रस्सा
- ४ चमचे घरगुती लाल तिखट
- १टीस्पून जीरे
- १/२ वाटी भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप
- १/२ वाटी भाजलेला कांदा
मासवडी रस्सा कृती
१. सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले कि मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..
२. कढईत तेल गरम करून त्यात हींग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला की बाजूला काढून ठेवावा आणि गार झाला की मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना घरगुती लाल तिखट आणि मिठही घालावे. वाटलेले कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.
३. सारण तयार झाले की आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हींग, हळद, जीरे, लसूण आणि हिरवी मिर्च पेस्ट घालून परतून घ्यावे. एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घालावे. पाण्यात मीठ घालावे. त्यात बेसन घालून पाण्यात बेसन पीठ नीट मिक्स करून घ्यावे. गुठळ्या होवू देउ नयेत. फोडणीमध्ये बेसन पीठ आणि पाणी मिक्स केलेले मिश्रण टाकावे व मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खावून पहावे. कच्चं लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे किंवा पीठ हाताला चिकटत नाही हे बघावे.
४. पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच कॉटनच्या कपड्यांवरं मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.
५. कढईमध्ये तेल तापवावे त्यात मोहरी, जीरे आणिहींग घालावे आणि घरगुती मसाला घाला आणि मिनिटभर परतवा. कांदा लसुण खोबरे वाटण आणि उरलेले सारण घालून मिक्स करावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. रस्सा बनवण्यासाठी पानी घाला. पानी घातल्यावर मोठ्या आचेवर रस्सा उकळून घ्या. त्यानंतर कढईला लागलेली खरवड,मीठ व कोथिंबीर घालून चांगले मंद गॅसवर पाच मिनिटे उकळून घेणे. मासवडी रस्सा तयार आहे.वड्यांवर रस्सा टाकून बाजरीची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर त्याचा आनंद घ्या.हा पदार्थ शिजवायला थोडे अवघड आहे पण चवीला अप्रतिम आहे.