रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. यामध्येच तोंडलीची भाजी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. पण, अनेक जण तोंडलीची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत तोंडली खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर आज आपण पौष्टीक, मसालेदार ‘तोंडलीचा भात’ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
  • अर्धा किलो तोंडली (उभी कापून घ्या)
  • एक चमचा आलं, लसूण, मिरचीची पेस्ट
  • दोन चमचे तूप
  • हिंग
  • १/२ चमचा हळद
  • आंबेमोहोर तांदूळ किंवा बासमती राईस सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
  • काजू ७ ते ८
  • हिरव्या मिरच्या ७ ते ८
  • किसलेलं खोबरं
  • लिंबाचा रस
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • आवडीनुसार गोड मसाला वापरू शकता.
  • मीठ

हेही वाचा…एक किलो तांदूळ, पाव किलो मटार घालून करा ‘हेल्दी पालक राईस’ ; नोट करा रेसिपी

कृती :

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तांदूळ घेऊन ते पाण्यांत तीन ते चार तास भिजत घालावेत.
  • त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरची, कोथिंबीर घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
  • त्यानंतर एक दुसरे मोठे भांडे घ्या. त्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्या.
  • नंतर त्यात हिंग, हळद, पाण्यात भिजत घातलेला तांदूळ आणि बारीक करून घेतलेली पेस्ट घालून घ्या.
  • तसेच मिश्रणात चिरून घेतलेली तोंडली, भिजवून घेतलेलं काजू, चवीनुसार मीठ, पाणी घालून घ्या आणि मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या.
  • तर आता भांड्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे एक वाफ येऊ द्या. या वाफेवर भात शिजवून घ्या.
  • भात शिजवून घेतल्यावर त्यात लिंबाचा रस, थोडं तूप (आवडीनुसार) किसलेलं खोबरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचा ‘तोंडली भात’ तयार.