अनेक घरांमध्ये भाज्यांपेक्षा डाळ जास्त आवडीने खाल्ली जाते. वरण -भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. पण नेहमी नेहमी त्याच चवीचा वरण भात खाऊन कंटाळा येतो. जेवणाला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. घरी बनवल्या जाणाऱ्या डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही रेसिपीत काही सोपे बदल करू शकता. आम्ही तुमच्यासाठी खास नागपुरी पद्धतीचे खास फोडणीचे वरण घेऊन आलो आहोत. नुसत्या सुगंधानेच खावेसे वाटेल असे ” फोडणीचे वरण ” नक्की ट्राय करा.
नागपुरी फोडणीचे वरण साहित्य
१/२ वाटी तुरीची डाळ
१/४ वाटी मुगाची डाळ
१/४ वाटी मसूर ची डाळ
१/४ वाटी पेक्षा कमी चणा डाळ
१ कांदा, १ टोमॅटो
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१ टेबल स्पून आले लसुण पेस्ट
१-१ टी स्पून जीरे मोहरी
१ टी स्पून हिंग
१ टेबल स्पून तिखट
१ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
५ ते ६ गोडलिंबाची पाने
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
३ टेबल स्पून फोडणीसाठी तेल
पाणी आवश्यकतेनुसार
नागपुरी फोडणीचे वरण कृती
१. एका ताटात डाळी काढून घ्या. कूकरमध्ये पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घ्या. आणि २ ग्लास पाणी घालून ४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.
२. कूकर थंड होईपर्यंत कांदा टोमॅटो हिरवी मिरची चिरून घ्या. कढीपत्ता धुवून चिरून घ्या. आता डाळीचा कूकर उघडुन घ्या.
३. एका भांड्यात तेल गरम करून मोहरी तडतडल्यावर जीरे घालावे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालून परतून घ्या. आले लसुण पेस्ट, तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ आणि टोमॅटो घालून २ मिनिट शिजवून घ्या. टोमॅटो शिजल्यावर कूकरमधील डाळ मिक्स करून घ्यावी.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा स्पेशल कांदा कुरडई; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
४. आवशक्तेनुसार गरम पाणी घालून २ ते ३ उकळ्या येऊ द्या. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. गरम गरम फोडणीचे वरण भाताबरोबर सर्व्ह करा.
(ही रेसिपी कूकपॅडवरुन घेतली आहे.)