लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गोड खायला आवडते. लहान मुले तर आवडीने गोड भात सुद्धा खातात. गोड भात हा अत्यंत पौष्टिक आणि तितकाच टेस्टी असतो. जर तुम्हाला घरीच टेस्टी गोड भात बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. लहान मुलांसाठी हा एक चांगला हेल्दी आहार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बासमती तांदुळ
  • साखर
  • तूप
  • केसर
  • मनुका
  • मेवे
  • जायफळ पावडर
  • वेलची
  • लवंग
  • चांदीची वर्क
  • पाणी

हेही वाचा : बहिणींनो, या रक्षाबंधनला भावासाठी करा घरीच चॉकलेट केक; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • तांदूळ उकळून घ्या.
  • अर्धा कप पाण्यात साखर टाका आणि पाक बनवा आणि त्यात केशर टाका
  • एका कढईत तूप गरम करा आणि त्यात लवंग, वेलची तळून घ्या.
  • आता त्यात शिजलेले तांदूळ टाका आणि वरुन साखरेचा पाक टाका
  • आणि चांगले परतून घ्या.
  • त्यावर मनुके, जायफळ आणि मेवे टाका
  • आणि गॅस मंद आचेवर ठेवा.
  • भात शिजल्यानंतर सर्व्ह करताना चांदीचा वर्क लावा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharastrian food god bhat recipe for children food lovers sweets food for foodie ndj