Mahashivratri 2023: हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यावेळी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शिवाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. यासोबतच शिवभक्त या दिवशी उपवास देखील ठेवतात. जर तुम्हीही शिवरात्रीचा उपवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुम्हाला साबुदाणा खिचडीची सोपी रेसिपी सांगणार आहोत, जी पोट भरण्यासोबतच शरीरातील एनर्जी लेव्हल देखील टिकवून ठेवते. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जाणून घ्या यासाठी लागणारं साहित्य:
- साबुदाणा – १ कप (भिजवलेला)
- बटाटा (उकडलेले)
- हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- शेंगदाणे १/२ कप
- कोथिंबीरीची पाने
- जिरे – १ टीस्पून
- मिरची पावडर
- मीठ
- तेल
( हे ही वाचा: कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे अशाप्रकारे बनवा सांडगे; २- ३ वर्षे आरामात टिकतील)
साबुदाणा खिचडी कशी बनवायची?
- साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून किमान १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
- यानंतर, साबुदाणा खिचडी करण्यासाठी, सर्वात आधी बटाटे उकडून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.
- त्यानंतर तवा गरम करून त्यात शेंगदाणे टाका. शेंगदाणे तेलाशिवाय भाजायचे आहेत हे लक्षात ठेवा.
- हलके भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.
यानंतर हे दाणे कशाच्या तरी साहाय्याने हलकेच कुस्करून घ्या. - आता मंद आचेवर पॅन गरम करा, नंतर त्यात सुमारे दोन चमचे रिफाइंड तेल घाला.
- तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून जिरे आणि उकडलेले बटाटे घाला.
- आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्या.
- बटाटे हलके तपकिरी रंगाचे झाल्यावर त्यात ठेचलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून नीट ढवळून घ्या.
- त्यानंतर त्यात साबुदाणा टाका आणि सतत ढवळत राहा. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवावी.
- साधारण दोन मिनिटांनी गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे.
First published on: 16-02-2023 at 16:55 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2023 break your fast with healthy tasty sabudana khichdi know how to prepare gps