Mahashivratri 2024 Recipe : येत्या ८ मार्चला महाशिवरात्री येत आहे. या दिवशी अनेकांचे दिवसभर उपवास असतात. अशावेळेस शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक ते पोषक घटक पुरवण्यासाठी फळे आणि उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. तसेच अनेक जण थंडाईदेखील अगदी आवडीने पितात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुक्यामेव्यांपासून बनवलेली, शरीराला दिवसभर ऊर्जा पुरवणारी ही थंडाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. याची सोपी रेसिपी BecomeAChefAtHome नावाच्या युट्यूब चॅनेलने शेअर केलेली आहे. पौष्टिक आणि ऊर्जा देणारी थंडाई बनवण्याची कृती लिहून यंदाच्या महाशिवरात्रीला बनवून पाहा.
साहित्य
१ वाटी टरबूजाच्या बिया
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
१ वाटी पिस्ता
१ वाटी खसखस
१ वाटी वेलची
८-९ काळी मिरी
१ दालचिनी
गुलाबाच्या पाकळ्या [कोरड्या]
१ वाटी साखर
केशर
दूध
खायचा रंग [इच्छेनुसार]
हेही वाचा : Recipe : उपवासाचा दिवशी बनवून बघ ही कुरकुरीत भजी; काय आहे रेसिपी पाहा…
कृती
थंडाईची पूर्व तयारी :
काजू, बदाम, पिस्ता, टरबूजाच्या बिया आणि खसखस हे काही वेळासाठी किंवा रात्रभर भिजवून ठेवावे.
सर्वप्रथम भिजवलेले एक वाटी काजू, १ वाटी बदाम, १ वाटी पिस्ता, १ वाटी टरबूजाच्या बिया आणि १ वाटी खसखस मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
आता या वाटलेल्या मिश्रणात एक वाटी दूध घालून, पुन्हा काजू-बदामाचे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून, त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
तयार झालेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवून द्या.
आता पुन्हा एका स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच वेलची, आठ-नऊ काळी मिरी, एक दालचिनी आणि लहान चमचा वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असे सर्व पदार्थ घालून त्यांची बारीक पावडर करून घ्यावी.
ही पावडर एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवा.
हेही वाचा : संकष्टी चतुर्थी विशेष साबुदाण्याची खीर; उपवासाच्या दिवशी बनवा ही खास गोड रेसिपी…
थंडाई :
- गॅसवर एक पातेले मध्यम आचेवर ठेवा.
- त्यामध्ये म्हशीचे साधारण अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवून द्यावे.
- दूध पूर्णपणे उकळल्यानंतर एका डावाच्या मदतीने मंद आचेवर ते ढवळत राहावे.
- आता यामध्ये एक लहान चमचा केशर, गुलाबाच्या पाकळ्यांची तयार केलेली कोरडी पावडर आणि काजूची तयार केलेली ओली पेस्ट घाला.
- सर्व पदार्थ घालून झाल्यावर दूध पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- आता या दुधात एक वाटी साखर घालून सर्व मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
- तुम्हाला हवा असल्यास, एक छोटा चमचा खायचा पिवळा रंग, तयार होत असलेल्या थंडाईमध्ये घालून, दुधाला एक शेवटची उकळी आणावी.
- दुधाला उकळी आल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करावा.
- आता हे थंडाई साधारण ३० ते ४० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवून द्या.
- थंड झालेली थंडाई ग्लासमध्ये ओतून, त्यावर पिस्त्याची भरभरीत पावडर आणि गुलाबाच्या कोरड्या पाकळ्यांनी सजावट करावी.
- महाशिवरात्रीसाठी ऊर्जा देणारी, तशीच अत्यंत पौष्टिक अशी थंडाई पिण्यासाठी तयार आहे.
टीप- दुधाचे प्रमाण हे अंदाजे सांगितलेले आहे. तुम्हाला हवे तसे दुधाचे प्रमाण वाढवून घ्यावे.
युट्यूबवरून @BecomeAChefAtHome नावाच्या चॅनेलने या थंडाईच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे.